वाई बाजार येथे सर्व निर्बंध पाळत पोलिसांसमवेत साजरी झाली भीम जयंती…..

वाई बाजार येथे सर्व निर्बंध पाळत पोलिसांसमवेत साजरी झाली भीम जयंती…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
माहूर (राजकिरण देशमुख) :-
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डाँ. बाबासाहेब आंबेडकर यांची 130 वी जयंती सिंदखेड पोलीसांच्या समवेत सर्व निर्बंध पाळत सामाजिक अंतराचे भान ठेवून वाई बाजार ग्रामपंचायत कार्यालय, डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक व दीपवंश विहारात नांदेड जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष तथा विद्यमान सदस्य समाधान जाधव यांच्या हस्ते बोद्ध ध्वजारोहण करून भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर,व स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, स्त्री शिक्षणाचे जनक थोर समाज सुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेला पुष्प हार अर्पण करून जयंती साजरी करण्यात आली.
त्याप्रसंगी वाई ग्रामपंचायतीचे उपसरपंच हाजी उस्मान खान, ग्रामपंचायत सदस्य उत्तम दत्तात्रय कलाने पोलीस उपनिरीक्षक जयसिंग राठोड, ज्येष्ठ पत्रकार राजू पडलवार, सुभाष खडसे, सामाजिक कार्यकर्ते फिरोज खान हैदर खान पठाण, नवीद,खान मजित खान, , माजी तंटामुक्ती अध्यक्ष कैलास बेहेरे, बाबाराव कंधारे, नंदकिशोर कटकमवार, किशोर शिंदे, दिलीप पटेकर, कारकुन अल्लावली, जावेद खान, संदीप केळकर आदी लोक उपस्थित होते.

सुप्रिया सुळे प्रशांत जगतापांच्या नाराजीवर स्पष्टच बोलल्या; म्हणाल्या, ‘समाजात काम करताना नाराजी…’
गड्डमवार यांनी घडलेली विकास व कृषी क्रांती आजही प्रेरणादायी; आ. विजय वडेट्टीवार यांचे प्रतिपादन….
मंत्री नितेश राणेंसह दोन आमदारांविरुद्ध अटक वॉरंट जारी; न्यायालयाचा नेतेमंडळींना दणका….
एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा, दुसरीकडे फडणवीस सरकारचे चार महत्त्वाचे निर्णय समोर…..
काँग्रेसचा बुलंद आवाज हरपला ; महाराष्ट्राच्या माजी वनमंत्र्यांचे उपचारादरम्यान निधन….
जागावाटप ते महापौरपद, ठाकरे बंधूंनी सर्वच सांगितलं, मनसे-ठाकरेंकडून अधिकृत युतीची घोषणा….