न.पं. मुख्याधिकारी यांना निवेदनाद्वारे प्रभागांमध्ये शुद्ध पाणी पुरवठा करण्याची मागणी :- शैलेश कोपरकर… तिन,चार,पाच प्रभागांमध्ये दुषित पाण्याचा पुरवठा नगर पंचायत चे दुर्लक्ष….

न.पं. मुख्याधिकारी यांना निवेदनाद्वारे प्रभागांमध्ये शुद्ध पाणी पुरवठा करण्याची मागणी :- शैलेश कोपरकर…
तिन,चार,पाच प्रभागांमध्ये दुषित पाण्याचा पुरवठा नगर पंचायत चे दुर्लक्ष….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
महागांव :- महागांव शहरातील तिन, चार, पाच प्रभागांमध्ये नळावाटे नागरिकांना गढूळ पाण्याचा पुरवठा होत असल्याचे चित्र दिसून येत असून या दुर्गंधीयुक्त व गढूळ हे पाणी पिण्यायोग्य नसल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. आणी त्यामुळे नागरिकांचा जिवाला धोका निर्माण झाला आहे.
शहरातील विविध प्रभागात नागरिकांना न.प. पाणी पुरवठा पाईपलाईन द्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात येतो. उन्हाळा असल्याने पाण्याची पातळी कमी झाली आहे.
शहरामध्ये कोरोना प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असल्याने रुग्ण आढळत आहेत. प्रशासनाकडून गांभीर्य पुर्वक पाउले उचले जात असून प्रभागांमध्ये काही दिवसांपासून दुषित पाण्याचा पुरवठा होत असुन नगरपंचायत ने यावर निर्बंध घालण्यासाठी ठोस पावले उचलली नसल्याने नागरिकांना दुषित पाण्याचा वाफर करावा लागत आहे.
शहरातील तिन चार पाच प्रभागांमध्ये गढूळ व दुक्षीत पाण्याचा पुरवठा होत असल्याचे नागरिकाच्या निदर्शनास येत आहे. त्यामुळे हे पाणी पिण्यासाठी कसे वापरावे असा प्रश्न नागरिकांसमोर उभा आहे.
गेल्या काही दिवसांपासून तिन चार पाच प्रभागांमध्ये नागरिकांना गढूळ पाण्याचा पुरवठा होत आहे. या पाण्याला एक प्रकारचा घाणदर्प असल्याचा अनुभव नागरिकांना येत असून हे पाणी पिल्यामुळे नागरिकांना विविध आजार जडण्याची शक्यता नाकारता येत नाही. नगरपंचायत ने नागरिकांच्या आरोग्याशी निगडीत असलेल्या या गंभीर प्रश्ना कडे गांभिर्याने त्वरित लक्ष देऊन नागरिकांना स्वच्छ पाण्याचा पुरवठा करण्याची मागणी निवेदनाद्वारे माजी उपनगराध्यक्ष शैलेश कोपरकर यांनी केली आहे.

सुप्रिया सुळे प्रशांत जगतापांच्या नाराजीवर स्पष्टच बोलल्या; म्हणाल्या, ‘समाजात काम करताना नाराजी…’
गड्डमवार यांनी घडलेली विकास व कृषी क्रांती आजही प्रेरणादायी; आ. विजय वडेट्टीवार यांचे प्रतिपादन….
मंत्री नितेश राणेंसह दोन आमदारांविरुद्ध अटक वॉरंट जारी; न्यायालयाचा नेतेमंडळींना दणका….
एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा, दुसरीकडे फडणवीस सरकारचे चार महत्त्वाचे निर्णय समोर…..
काँग्रेसचा बुलंद आवाज हरपला ; महाराष्ट्राच्या माजी वनमंत्र्यांचे उपचारादरम्यान निधन….
जागावाटप ते महापौरपद, ठाकरे बंधूंनी सर्वच सांगितलं, मनसे-ठाकरेंकडून अधिकृत युतीची घोषणा….