बाल संरक्षण कक्षाने रोखला बालविवाह…


बाल संरक्षण कक्षाने रोखला बालविवाह…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
यवतमाळ, दि. 15 :- गत आठवड्यात चार बालविवाह रोखण्यात बाल संरक्षण कक्षाला यश आले असतांनाच गुरुवारी पुन्हा एक बालविवाह रोखण्यात आला. जिल्ह्यातील चूरमुरा ता. उमरखेड येथील वय वर्ष 16 असलेल्या बालिकेचा बालविवाह होत असल्याची गोपनीय माहिती जिल्हा बाल संरक्षण कक्षाला मिळाली. माहितीच्या आधारे बालविवाह रोखण्यात जिल्हा बाल संरक्षण कक्षाला यश आले.
सदर बाल विवाह रोखण्याची कार्यवाही जिल्हा महिला बाल विकास अधिकारी ज्योती कडू व जिल्हा बाल संरक्षण अधिकारी देवेंद्र राजूरकर यांच्या मार्गदर्शनात जिल्हा बाल संरक्षण कक्षाच्या सामाजिक कार्यकर्ता वनिता शीरफुले,समुपदेशक शिरीष ईगवे, गावातील उपसरपंच अर्जुन जाधव, ग्रामपंचायत सदस्य किरण दवणे, उमरखेड पोलिस स्टेशनचे अधिकारी संजय चौबे, पोलिस शिपाई रवि चव्हाण , पोलिस पाटील नारायण पवार, प्रवेक्षिका खरातडे यांच्या उपस्थितीत पार पडली.
०००००००

सुप्रिया सुळे प्रशांत जगतापांच्या नाराजीवर स्पष्टच बोलल्या; म्हणाल्या, ‘समाजात काम करताना नाराजी…’
गड्डमवार यांनी घडलेली विकास व कृषी क्रांती आजही प्रेरणादायी; आ. विजय वडेट्टीवार यांचे प्रतिपादन….
मंत्री नितेश राणेंसह दोन आमदारांविरुद्ध अटक वॉरंट जारी; न्यायालयाचा नेतेमंडळींना दणका….
एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा, दुसरीकडे फडणवीस सरकारचे चार महत्त्वाचे निर्णय समोर…..
काँग्रेसचा बुलंद आवाज हरपला ; महाराष्ट्राच्या माजी वनमंत्र्यांचे उपचारादरम्यान निधन….
जागावाटप ते महापौरपद, ठाकरे बंधूंनी सर्वच सांगितलं, मनसे-ठाकरेंकडून अधिकृत युतीची घोषणा….