टेस्टिंग व लसीकरणा साठी सर्वांचे सहकार्य आवश्यक – जिल्हाधिकारी अमोल येडगे
सामाजिक संघटनांसोबत बैठक…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
यवतमाळ, दि. 30-
जिल्ह्यात कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येला आळा घालण्यासाठी तसेच मृत्युदर कमी करण्यासाठी मास्कचा वापर, सामाजिक अंतराचे पालन आणि वारंवार हात धुणे या त्रिसुत्रीचा अवलंब करणे आवश्यक आहे. यासोबतच आता टेस्टिंग आणि लसीकरण याला सुध्दा प्राधान्य देण्यात आले असून यात सर्वांचे सहकार्य आवश्यक आहे, असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयात सामाजिक संघटनांच्या प्रतिनिधींसोबत आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार व-हाडे, उपविभागीय अधिकारी अनिरुध्द बक्षी, तहसीलदार कुणाल झाल्टे आदी उपस्थित होते.
आयसोलेशन, टेस्टिंग, ट्रेसिंग, लसीकरण आदी कामे प्रशासनाकडून करीत आहे. मात्र नागरिकांचा प्रतिसाद कमी पडत असल्यामुळे विविध सामाजिक संघटनांनी यासाठी प्रशासनासोबत काम करून जनजागृती करणे आवश्यक आहे. कोव्हीडवर नियंत्रण तसेच मृत्युदर कमी करायचा असेल तर टेस्टिंग आणि लसीकरणावर भर देण्याचा प्रशासनाचा मानस आहे. वाढता मृत्युदर ही अतिशय गंभीर बाब असून नागरिकांच्या सतत संपर्कात येणारे व्यापारी, दुकानदार, रिक्षाचालक यांनी टेस्टिंगसाठी समोर यावे. तसेच 45 वर्षापेक्षा जास्त वयोगट असलेल्या सर्व नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे. यासाठी प्रशासनाने नियोजन केले असून यवतमाळ शहरात लसीकरण केंद्रांची संख्या वाढविण्यात आली आहे. या केंद्रावर लसीकरणासाठी आपापल्या भागातील 45 वर्षांवरील नागरिकांना सामाजिक संघटनांच्या प्रतिनिधींनी स्वत: घेऊन यावे.
पुढील 15 ते 20 दिवसांत शहरातील सर्वांचे लसीकरण करण्याचे उद्दिष्ट आहे. टेस्टिंग तसेच लसीकरणाबाबत लोकांच्या मनातील शंका दूर करण्यासाठीसुध्दा विविध सामाजिक संघटनांनी पुढाकार घ्यावा. आपल्या संपर्कात येणा-या सर्वांची सुरक्षितता महत्वाची आहे. त्यामुळे सर्वांना लसीकरणाबाबत माहिती द्या, असे आवाहनही जिल्हाधिका-यांनी केले.
यावेळी सावित्रीबाई समाजकार्य विद्यालयाचे प्रा. घनश्याम दरणे, आर्ट ऑफ लिव्हिंगचे शंतनु शेटे, प्रयास संघटनेचे प्रशांत बनगिरवार, मुव्हमेंट फॉर पीस ॲन्ड जस्टीसचे राशिद अनवर, गायित्री परीवारचे गोविंद शर्मा, सावकलार सामाजिक संस्थेचे अजय बिहाडे, ग्रामीण समस्या मुक्ती ट्रस्टचे श्रीकांत लोडम, प्रकाश चहाकर, नारी रक्षा समितीचे सुकांत वंजारी, विनोद दोंदल यांच्यासह अनिल गायकवाड, राजू पडगीलवार आदी उपस्थित होते.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..