जिल्ह्यातील सर्व आस्थापना सकाळी 7 ते रात्री 8 वाजेपर्यंत सुरु राहणार….
जिल्ह्यातील सर्व आस्थापना सकाळी 7 ते रात्री 8 वाजेपर्यंत सुरु राहणार….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
यवतमाळ, दि. 01 :- राज्याचे मुख्य सचिव यांनी दिलेल्या ‘मिशन बिगीन अगेन’ अंतर्गत 28 मार्च 2021 नुसार यवतमाळ जिल्ह्याकरीता सुधारीत मार्गदर्शक सुचना निर्गमित करण्यात आलेल्या आहेत. सदर सुधारीत मार्गदर्शक सुचनेनुसार यवतमाळ जिल्ह्यात फौजदारी प्रक्रीया संहिताचे कलम 144 (1)(2)(3) अन्वये यवतमाळ शहर व जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागामध्ये दिनांक 28 मार्चपासून 15 एप्रिल 2021 च्या मध्यरात्री पावेतो रात्री 8 ते सकाळी 7 वाजेपावेतो जमावबंदी लागू करण्यात आलेली आहे.
यासंबंधात व्यावसायीकांकडून आस्थापना सुरु ठेवण्याच्या वेळेबाबत वारंवार विचारणा होत आहे. त्यामुळे याद्वारे स्पष्ट करण्यात येते की, यवतमाळ शहर व जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागामध्ये सर्व आस्थापना दिनांक 15 एप्रिल 2021 पावेतो सकाळी 7 ते रात्री 8 वाजेपावेतो सुरु ठेवता येणार आहे. मात्र सदर आदेश प्रतिबंधीत क्षेत्रासाठी लागू होणार नाही, असे निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार वऱ्हाडे यांनी आदेशान्वये कळविले आहे.
०००००००