13 मृत्युसह जिल्ह्यात 247 जण पॉझेटिव्ह ; 312 जण कोरोनामुक्त…

13 मृत्युसह जिल्ह्यात 247 जण पॉझेटिव्ह ; 312 जण कोरोनामुक्त…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
यवतमाळ, दि. 30 :- गत 24 तासात जिल्ह्यात 13 मृत्युसह 247 जण नव्याने पॉझेटिव्ह आले आहेत. तसेच वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्ड, विविध कोव्हीड केअर सेंटर आणि कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये भरती असलेल्या 312 जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली.
जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार मृत झालेल्या व्यक्तिंमध्ये यवतमाळ येथील 56, 82, 68, 73, 73, 77 वर्षीय पुरुष आणि 65 वर्षीय महिला, उमरखेड तालुक्यातील 68 आणि 63 वर्षीय पुरुष, घाटंजी तालुक्यातील 32 वर्षीय पुरुष, दिग्रस येथील 85 वर्षीय पुरुष तर तालुक्यातील 45 वर्षीय पुरुष आणि पुलगाव (जि. वर्धा) येथील 72 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. तसेच आज (दि.30) पॉझेटिव्ह आलेल्या 247 जणांमध्ये 166 पुरुष आणि 81 महिला आहेत. यात यवतमाळातील 123, वणी 25, पांढरकवडा 24, बाभुळगाव 17, दारव्हा 17, पुसद 10, उमरखेड 10, महागाव 9, दिग्रस 3, कळंब 2, नेर 2, राळेगाव 2, आर्णि 1, घाटंजी 1 आणि झरीजामणी येथील 1 रुग्ण आहे.
मंगळवारी एकूण 1972 रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 247 जण नव्याने पॉझेटिव्ह आले तर 1725 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. सद्यस्थितीत जिल्ह्यात 2409 ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह असून यापैकी रुग्णालयात भरती 1161 तर गृह विलगीकरणात 1248 रुग्ण आहेत. तसेच आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 28136 झाली आहे. 24 तासात 312 जण कोरानामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या 25082 आहे. तर जिल्ह्यात एकूण 645 मृत्युची नोंद आहे.
सुरवातीपासून आतापर्यंत 265455 नमुने पाठविले असून यापैकी 257941 प्राप्त तर 7514 अप्राप्त आहेत. तसेच 229805 नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे जि.प. आरोग्य विभागाने कळविले आहे.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..