शिया वक्फ बोर्डाचे माजी अध्यक्ष वसीम रिजवी वर कारवाई करण्याची मागणी…

शिया वक्फ बोर्डाचे माजी अध्यक्ष वसीम रिजवी वर कारवाई करण्याची मागणी…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
माहूर :-
मुस्लीम समाजाच्या धार्मीक भावना दुखवल्या बद्दल माहूर पोलिस स्टेशन येथे तक्रार वजा निवेदन दाखल करण्यात आली तक्रारीत मध्ये असे सांगण्यात आले आहे की , वसीम रिजवी नामक एका विकृत मानसिकतेच्या व्यक्तीने कुरआन- ए – पाक संबंधी आपत्तीजनक भाष्य करुन समाजाच्या भावना दुखावलेल्या आहेत . तसेच धार्मीक ग्रंथ कुराण मधील २६ आयते काढून टाकण्यासंबंधी सुप्रीम कोर्टात पी.आय.एल. सुध्दा दाखल केलेली आहे . यामुळे समस्त समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या असून हा आमच्या धार्मीक ग्रंथाचा अवमान देखील आहे . वसीम रिजवीच्या या कृती विरोधात सर्व स्तरावर संताप व्यक्त होत असून अश्या विकृत मानसिकतेच्या व्यक्तीला समाजात राहण्याचा कुठलाही नैतिक अधिकार नाही असे निवेदनात म्हटले आहे.मुस्लिम समाज यांनी माहूर पोलीस निरीक्षक यांना विनंती केलि आहे की ,वसीम रिजवी विरुध्द समाज भावना दुखावल्या बद्दल आणि धार्मिक ग्रंथाचा अवमान केल्याबद्दल विविध कलमान्वेय ताबडतोब गुन्हा दाखल करावा असे मागणी काँग्रेस नगरसेवक इलियास बावाणी,अजीम सय्यद,निसार कुरेशी ,करीम शाह,काझी सय्यद सलमान सह आदि चा सहभाग होता.

सुप्रिया सुळे प्रशांत जगतापांच्या नाराजीवर स्पष्टच बोलल्या; म्हणाल्या, ‘समाजात काम करताना नाराजी…’
गड्डमवार यांनी घडलेली विकास व कृषी क्रांती आजही प्रेरणादायी; आ. विजय वडेट्टीवार यांचे प्रतिपादन….
मंत्री नितेश राणेंसह दोन आमदारांविरुद्ध अटक वॉरंट जारी; न्यायालयाचा नेतेमंडळींना दणका….
एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा, दुसरीकडे फडणवीस सरकारचे चार महत्त्वाचे निर्णय समोर…..
काँग्रेसचा बुलंद आवाज हरपला ; महाराष्ट्राच्या माजी वनमंत्र्यांचे उपचारादरम्यान निधन….
जागावाटप ते महापौरपद, ठाकरे बंधूंनी सर्वच सांगितलं, मनसे-ठाकरेंकडून अधिकृत युतीची घोषणा….