अखेर पळवून नेलेली अल्पवयीन मुलगी आरोपीचे आईसह पोलिसांच्या ताब्यात, मुख्य आरोपी मात्र फरार… उपविभागीय पोलिस अधिकारी अनुराग जैन यांच्या टीमची कौतुकास्पद कामगिरी…
अखेर पळवून नेलेली अल्पवयीन मुलगी आरोपीचे आईसह पोलिसांच्या ताब्यात, मुख्य आरोपी मात्र फरार…
उपविभागीय पोलिस अधिकारी अनुराग जैन यांच्या टीमची कौतुकास्पद कामगिरी…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
पुसद :- 16 वर्षीय अल्पवयीन मुलीला गावातीलच तरुणाने फूस लावून पळवून नेल्या प्रकरणी दोन महिन्याच्या आत मोबाईल लोकेशन नुसार शोध लावला परंतु ऐन वेळेवर मुख्य आरोपी फरार होण्यात यशस्वी झाला असला तरी पोलिसांनी मात्र अल्पवयीन मुलीसह आरोपीचे आईस ताब्यात घेण्याची कामगिरी बजावली आहे हे विशेष.
पोलिस स्टेशन पुसद शहर अंतर्गत येत असलेल्या आरेगाव येथील सोळा वर्ष पाच महीने वय असलेल्या अल्पवयीन मुलीला गावातीलच निलेश राठोड नामक मुलाने पळवून नेल्याची तक्रार मुलीचे वडिलांनी पोलिस स्टेशन पुसद शहरला दि. २८ जानेवारी 2021 रोजी दिली होती. परंतु पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध भा द वि 363 चा गुन्हा दाखल केला होता. परंतु आरोपीचे नाव फिर्यादी पक्षाने सांगितले असताना गुन्हा आरोपीविरुद्ध दाखल केला नाही असा प्रश्न बिरसा मुंडा ब्रिगेड या सामाजिक संघटनेच्या माध्यमातून उपस्थित केला असता त्यानंतर पोलिसांनी आरोपी निलेश बळीराम राठोड वय 21 वर्ष राहणार आरेगाव याचेवर विरुद्ध भादवि चे कलम 363 सह ॲट्रॉसिटी च्या कलमाअंतर्गत वाढीव गुन्हा 2 फेब्रुवारी 2021 रोजी
दाखल केले.
त्यानंतर सदर प्रकरणाचा तपास पुसदचे उपविभागीय पोलिस अधिकारी यांचेकडे वर्ग करण्यात आला त्यानुसार उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी तपासाची चक्रे आपल्या हातात घेत अल्पवयीन मुलीचा शोध घेण्याच्या दृष्टीने वेगवेगळी शोध पथके निर्माण केली. अल्पवयीन मुलगी ही पश्चिम महाराष्ट्रात असल्याचा गोपनीय सुगावा लागताच उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी एक पथक पुणे येथे तर दुसरे पथक सांगली येथे शोध कामी पाठविले.
त्यानुसार आज सांगली जिल्ह्यामधील एका शेतामध्ये ऊस तोडणीचे काम करीत असताना पळवून नेलेली अल्पवयीन मुलगी आरोपीचे आई सोबत मिळाली.
तपासकामी गेलेल्या पथकांनी आरोपीचे आईसकट अल्पवयीन मुलीला ताब्यात घेऊन पुसद गाठले. मुख्य आरोपीला अद्याप अटक झालेली नाही. आरोपी फरार असल्याचे सांगितल्या गेले.
उपविभागीय पोलिस अधिकारी अनुराग जैन यांच्या यशस्वी मार्गदर्शनाखाली अल्पवयीन मुलीचा शोध घेतल्याने पोलिसांचे सर्वत्र कौतुक होताना दिसत आहे तर दुसरीकडे आता अल्पवयीन मुलीस पळवून नेणे, तिला ताब्यात- डांबून ठेवण्यास सहकार्य करणे, तिच्यावर अतिप्रसंग करणे यासह आणखी कोणते गुन्हे निलेश राठोड यांच्यासह त्यांना सहकार्य करणाऱ्या आई-वडिलांसह इतरांवर गुन्हे दाखल होतात का? याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.