महागाव तालुक्यातील २ ग्रामपंचायत अविरोध ; अखेरच्या दिवशी ३१९ नामांकन नामांकन मागे ; १२३२ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
रियाज पारेख : ९६३७८८६७७७
महागाव :
महागाव तालुक्यातील ७३ ग्रामपंचायत निवडणुकीत अखेरच्या दिवशी ३१९ उमेदवारांनी नामांकन मागे घेतल्याने आता १२३२ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात कायम आहेत. तालुक्यातून केवळ दोन ग्रामपंचायत अविरोध झाल्यास असून तालुक्यातील १२४ सदस्य अविरोध निवडूण आले आहे.
१५ जानेवारीला होणाऱ्या
महागाव तालुक्यातील ७३ ग्रामपंचायत साठी हि निवडणूक होणार आहे.त्यासाठी तालुक्यातील ६६७ वार्डासाठी नामनिर्देशन भरण्याची प्रक्रिया सुरू होती. तब्बल १७२३ नामनिर्देशन पत्र निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे प्राप्त झाले होते.त्यात विविध कारणाने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी २० नामांकन अपात्र ठरविले.निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेण्यासाठी अखेरच्या दिवशी ३१९ उमेदवारांनी नामांकन मागे असल्याने १२३२ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात कायम आहेत.तर महागाव तालुक्यातील चीचपाड आणि टेंभी ह्या दोन ग्रामपंचायत अविरोध झाल्या आहेत.तालुक्यातील १२४ जागेकरिता प्रत्येकी एकच नामांकन अर्ज प्राप्त झाल्याने ह्या जागा अविरोध झाल्या आहेत.
तालुक्यातील अविरोध झालेल्या ग्रामपंचायत आणि एका जागेसाठी प्रत्येकी एकच नामांकन प्राप्त झालेले १२४ जागेवरील उमेदवार विजयी म्हणून अधिकृत घोषणा मतमोजणी नंतरच करण्यात येईल अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी यांनी दिली आहे.

सुप्रिया सुळे प्रशांत जगतापांच्या नाराजीवर स्पष्टच बोलल्या; म्हणाल्या, ‘समाजात काम करताना नाराजी…’
गड्डमवार यांनी घडलेली विकास व कृषी क्रांती आजही प्रेरणादायी; आ. विजय वडेट्टीवार यांचे प्रतिपादन….
मंत्री नितेश राणेंसह दोन आमदारांविरुद्ध अटक वॉरंट जारी; न्यायालयाचा नेतेमंडळींना दणका….
एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा, दुसरीकडे फडणवीस सरकारचे चार महत्त्वाचे निर्णय समोर…..
काँग्रेसचा बुलंद आवाज हरपला ; महाराष्ट्राच्या माजी वनमंत्र्यांचे उपचारादरम्यान निधन….
जागावाटप ते महापौरपद, ठाकरे बंधूंनी सर्वच सांगितलं, मनसे-ठाकरेंकडून अधिकृत युतीची घोषणा….