महात्मा रावण दहनाची कुप्रथा बंद करा…. उमरखेड तालुक्यातील आदिवासी समाजांचे उपविभागीय पोलिस अधिकारी यांना निवेदन….

महात्मा रावण दहनाची कुप्रथा बंद करा….
उमरखेड तालुक्यातील आदिवासी समाजांचे उपविभागीय पोलिस अधिकारी यांना निवेदन….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
पोफाळी (उमरखेड) :-
देशात दसऱ्याच्या मुहूर्तावर रावण दहनाचा कार्यक्रम सर्वत्र साजरा होत असतो. मात्र रावण दहन कुप्रथेमुळे आदिवासी समाजाच्या भावना दुखावल्या जातात. यासाठी रावण दहन ही कुप्रथा बंद करावी यासाठी उमरखेड तालुक्यातील आदिवासी समाजातर्फे उपविभागीय पोलिस अधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
निवेदनामध्ये महात्मा राजा रावण आदिवासी समाजाच्या संस्कृतीचा वैभवशाली वारसा असून दैदिप्यमान व स्मरणीय ठेवा आहे. देवता समान आदिवासी समाजाचे महात्मा रावण हे श्रद्धास्थान आहे. म्हणून आदिवासी समाजासाठी आराध्य असणाऱ्या महात्मा रावण यांच्या रावण दहनाच्या कुप्रथेमुळे समाजाच्या भावना दुखावल्या जातात. यासाठी उपविभागीय पोलिस अधिकारी यांनी तालुक्यात कुठेही रावण दहनाच्या कार्यक्रमाला परवानगी देऊ नये.असे निवेदन समाजांच्या वतीने देण्यात आले. यावेळी आदिवासी समाजाच्यावतीने भागवत काळे, जयराम कराळे, निकेश गाडगे,राजू गायकवाड, दिगांबर धुळे, गजानन बोडके, माधव आढाव, वैभव इंगळे आदी उपस्थित होते.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..