यवतमाळ जिल्ह्यात ‘ओला दुष्काळ’ जाहीर करा :- आ.इंद्रनील नाईक
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
यवतमाळ :-
यवतमाळ जिल्ह्यात ओला दुष्काळ’ जाहिर करा अशी मागणी आमदार इंद्रनिल नाईक, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष ख्वाजा बेग व पदाधिकारी यांनी मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे यांना निवेदनाद्वारे केली.
यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी परतीच्या पावसामुळे हवाल दिल झालेला आहे. कापणीसाठी आलेला सोयाबीन असो की कापूस, या अतिवृष्टी मुळे शेतक-यांच्या तोंडाशी आलेला घास निसर्गाच्या लहरीपणामुळे हातातून निघून गेला आहे.पिकांचे आतोनात नुकसान झाल्याने शेतकरी बांधव आर्थिक दृष्टचक्रात सापडले आहे.
अशा स्थितीत जिल्ह्यातील शेतक-यांच्या शेती नुकसानीची तातडीने पाहणी करून जिल्ह्यात ‘ओला दुष्काळ ‘ जाहिर करून शेतक-यांना आर्थिक मदत तातडीने देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली.या निवेदनासोबत शेतातील उद्धवस्त झालेले सोयाबीन व निकामी झालेले कापसाचे बोंड प्रत्यक्षात दाखवून स्थितीचे गांभीर्य लक्षात आणून देण्यात आले.
यावेळी जि.प. उपाध्यक्ष बाळासाहेब कामारकर, नानाभाऊ गाडबैले, वसंतराव घुईखेडकर, विवेक देशमुख, रा.काँ. महिला जिल्हाध्यक्षा क्रांतीताई राऊत, बाबुसिंग आडे, जि. प. सदस्य अशोक जाधव, हरीश कुडे आदि उपस्थित होते.

सुप्रिया सुळे प्रशांत जगतापांच्या नाराजीवर स्पष्टच बोलल्या; म्हणाल्या, ‘समाजात काम करताना नाराजी…’
गड्डमवार यांनी घडलेली विकास व कृषी क्रांती आजही प्रेरणादायी; आ. विजय वडेट्टीवार यांचे प्रतिपादन….
मंत्री नितेश राणेंसह दोन आमदारांविरुद्ध अटक वॉरंट जारी; न्यायालयाचा नेतेमंडळींना दणका….
एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा, दुसरीकडे फडणवीस सरकारचे चार महत्त्वाचे निर्णय समोर…..
काँग्रेसचा बुलंद आवाज हरपला ; महाराष्ट्राच्या माजी वनमंत्र्यांचे उपचारादरम्यान निधन….
जागावाटप ते महापौरपद, ठाकरे बंधूंनी सर्वच सांगितलं, मनसे-ठाकरेंकडून अधिकृत युतीची घोषणा….