तत्कालीन ठाणेदार अनिलसिंग ठाकूर यांच्यावर अखेर गुन्हा दाखल #भीमा हाटे मारहाण प्रकरण ; राज्य गुन्हे शाखेकडून फिर्याद दाखल
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
पुसद :
राज्यभर गाजलेल्या भीमा हाटे मृत्यू प्रकरणात मयतास
मारहाण करणाऱ्या तत्कालीन ठाणेदार अनिल सिंह दशरथ सिंग (ठाकूर) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडून पुसद पोलिस स्टेशन मध्ये फिर्याद दाखल करण्यात आली असून विविध कलमान्वये गुन्हा नोंद करण्यात आला.
याबाबत सविस्तर असे की,मयत भीमा हाटे व त्याचा भाऊ अर्जुन यांच्यावर पुसद पोलिस स्टेशन मध्ये एका प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानुसार त्यांना अटक करण्यात आली होती. दरम्यान भीमा हटे यास तात्कालीन ठाणेदार अनिल यांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याने भीमा हाटे याचा उपचारा दरम्यान मुर्त्यू झाला.याप्रकरणी अपर पोलीस महासंचालक यांनी चौकशी करण्याचे आदेश दिले.त्यानुसार राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडून चौकशी करण्यात आली असता तात्कालीन ठाणेदार अनिल सिंह गौतम हे दोषी आढळल्याने त्यांच्यावर राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडून पुसद पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद नोंदविण्यात आली त्यानुसार भादवी कलम ३२३,५०४ सहकलम ३(१)(१०),अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा सुधारित ३(१)(r)(s) अ. जा.ज.प्र. कायदा नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे.