जिल्ह्यात 94 जण नव्याने पॉझेटिव्ह;तिघांचा मृत्यु
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
यवतमाळ दि. 22 : जिल्ह्यात गत 24 तासात 94 जण नव्याने पॉझेटिव्ह आले असून तीन कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यु झाला आहे. मृत झालेल्यांमध्ये यवतमाळ शहरातील 27 वर्षीय महिला, उमरखेड शहरातील 50 वर्षीय पुरुष आणि कळंब तालुक्यातील 52 वर्षीय महिलेचा समावेश आहे.
नव्याने पॉझेटिव्ह आलेल्या 94 जणांमध्ये 62 पुरुष व 32 महिला आहेत. यात यवतमाळ शहरातील 20 पुरुष व तीन महिला, यवतमाळ तालुक्यातील दोन पुरुष व एक महिला, दारव्हा शहरातील 11 पुरुष व सहा महिला, घाटंजी शहरातील 10 पुरुष व सहा महिला, आर्णी शहरातील तीन पुरुष व चार महिला, दिग्रस शहरातील तीन महिला, महागाव तालुक्यातील एक पुरुष, मानोरा येथील एक पुरुष, मारेगाव शहरातील दोन पुरुष व तीन महिला, नेर तालुक्यातील एक महिला, पांढरकवडा शहरातील चार पुरुष व एक महिला, पुसद शहरातील दोन पुरुष, राळेगाव शहरातील दोन पुरुष व एक महिला, उमरखेड शहरातील एक पुरुष, वणी शहरातील तीन पुरुष व तीन महिलांचा समावेश आहे.
वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार सद्यस्थितीत जिल्ह्यात 547 ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह भरती असून होम आयसोलेशनमध्ये 733 जण आहेत. सुरवातीपासून आतापर्यंत जिल्ह्यात एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 7383 झाली आहे. यापैकी 6025 जण बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. तर जिल्ह्यात 223 मृत्युची नोंद आहे. सद्यस्थितीत आयसोलेशन वॉर्डात 268 जण भरती आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने सुरवातीपासून आतापर्यंत 68855 नमुने पाठविले असून यापैकी 67335 प्राप्त तर 1520 अप्राप्त आहेत. तसेच 59952 नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रशासनाने कळविले आहे.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..