राज्यमंत्री बच्चू कडू करोना पॉझिटिव्ह
स्वतः ट्विट करुन बच्चू कडू यांनी दिली माहिती
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
राज्यमंत्री बच्चू कडू यांचा करोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. माझी करोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. माझ्या संपर्कात आलेल्या सगळ्यांनी करोना चाचणी करुन घ्यावी असं ट्विट करत बच्चू कडू यांनी ही माहिती दिली आहे. शुक्रवारीच उर्जा मंत्री नितीन राऊत आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ या दोघांची करोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. आता शनिवारी (आज) राज्यमंत्री बच्चू कडू यांची करोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे.

शुक्रवारी दोन मंत्री करोना पॉझिटिव्ह
शुक्रवारी उर्जामंत्री नितीन राऊत आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ या दोन मंत्र्यांना करोनाची बाधा झाली. या दोघांनीही यासंदर्भातली माहिती ट्विट करत दिली. तसंच लवकरच आपण करोनावर मात करुन लोकांच्या सेवेत हजर होऊ असाही विश्वास व्यक्त केला. इतकंच नाही तर जे चे कुणी संपर्कात आले आहेत त्यांनीही करोना चाचणी करुन घ्यावी असं आवाहनही केलं.
मागील काही दिवसांपासून राज्यमंत्री बच्चू कडू हे सातत्याने लोकांच्या संपर्कात येत होते. अनेक कार्यक्रमांनाही त्यांची उपस्थिती होती. बच्चू कडू यांच्या पत्नी नयना कडू यांनाही करोनाची लागण झाली आहे. बच्चू कडू हे अचलपूरहून अमरावतीच्या दिशेने रवाना झाले आहेत. ते आता उपचारांसाठी कोणत्या शासकीय रुग्णालयात दाखल होणार हे अद्याप समजू शकलेलं नाही.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..