राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चेला कायमचा ब्रेक..? शरद पवारांच्या बैठकीनंतर बड्या नेत्यांकडून मोठा खुलासा….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- “महाराष्ट्राच्या राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाच्या चर्चेला मोठं वळण मिळालं आहे. शरद पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या नेशनलिस्ट कांग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) पक्षाच्या महत्त्वपूर्ण बैठकीत विलिनीकरणाच्या मुद्द्यावर सविस्तर चर्चा करण्यात आली.
मात्र, बैठकीनंतर पक्षाकडून आलेल्या संकेतांमुळे सध्या तरी विलिनीकरणाच्या चर्चेला ब्रेक लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
बैठकीनंतर खासदार सुप्रिया सुळे आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली. पक्षाची स्वतंत्र ओळख आणि विचारधारा कायम ठेवण्यावर बैठकीत भर देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. कार्यकर्त्यांच्या भावना, पक्षाची राजकीय दिशा आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्था तसेच विधानसभा निवडणुकांचा विचार करूनच कोणताही निर्णय घेतला जाईल, असे संकेत नेत्यांनी दिले.
आमच्या पक्षाच्या विलीनीकरणाचा विषय आता कायमचा संपल्यात जमा आहे. यावर भविष्यात कोणतीही चर्चा होणार नाही, अशा शब्दात राष्ट्रवादीचे (शरद पवार) प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे.
गेल्या काही दिवसांपासून अजित पवार गट आणि शरद पवार गट पुन्हा एकत्र येणार का, याबाबत राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू होती. दोन्ही गटांतील काही नेत्यांकडून सकारात्मक संकेत मिळाल्यानंतर विलिनीकरणाची शक्यता वाढल्याचे मानले जात होते. मात्र, आजच्या बैठकीनंतर त्या चर्चांना काहीसा विराम मिळाल्याचे दिसत आहे.
बैठकीत अनेक वरिष्ठ नेत्यांनी आपापली मते मांडली. पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये अजूनही स्वतंत्र राजकीय भूमिका कायम ठेवण्याची भावना प्रबळ असल्याचे काही नेत्यांनी बैठकीत नमूद केल्याची माहिती मिळत आहे. तसेच सध्याच्या राजकीय परिस्थितीत घाईघाईने कोणताही निर्णय न घेण्याचा सूर बैठकीत उमटल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान, राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबाबत अंतिम निर्णय अद्याप जाहीर करण्यात आलेला नसला तरी सध्यातरी पक्ष स्वतंत्रपणेच पुढे जाण्याच्या भूमिकेत असल्याचे स्पष्ट संकेत या बैठकीतून मिळाले आहेत.

भारताचा मोठा शत्रू, पुलवामा हल्ल्याचा मास्टरमाइंड हमाजाचा POK मध्ये खात्मा….
उष्णतेच्या लाटेचा रेड अलर्ट तर कुठे पावसाचा इशारा, वर्धा ४७.१, नागपूर ४६.६ अंशांवर…
“एकतर ठोस करार करा, नाहीतर…” ट्रम्प यांनी इराणला दिला अंतिम इशारा ; आखातात युद्धाचे ढग..!
शेतकरी कर्जमाफीचे पैसे लवकरच खात्यात जमा होणार, अधिकाऱ्यांच्या रजा-सुट्या रद्द ; युद्ध पातळीवर काम करण्याच्या सूचना….
राष्ट्रवादीचे 22 आमदार फुटणार..?
जमीन मोजणी, गावठाण नोंदी, नगर भूमापनासाठी सरकारचा मोठा प्लॅन; 50 नवी कार्यालयं, 10 हजार पदांवरही मोहर….
राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चेला कायमचा ब्रेक..? शरद पवारांच्या बैठकीनंतर बड्या नेत्यांकडून मोठा खुलासा….