उष्णतेच्या लाटेचा रेड अलर्ट तर कुठे पावसाचा इशारा, वर्धा ४७.१, नागपूर ४६.६ अंशांवर…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नागपूर :- “मान्सून आगेकूच करत असतानाच दुसरीकडे वाढत्या उष्णतेने नागरिकांना हैराण केले आहे. विदर्भात तर सूर्य अक्षरश: आग ओकत असून, बुधवारी वर्धा येथे ४७.१ अंश सेल्सिअस एवढ्या कमाल तापमानाची नोंद झाली.
दुसरीकडे कोकणसह मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत विजेच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे.
उर्वरित राज्याच्या तुलनेत मुंबईकरांना दिलासा आहे. मुंबईचे कमाल तापमान ३४ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले असून, मुंबईत काही प्रमाणात हवामान ढगाळ आहे.
मान्सूनची काय स्थिती?
मान्सून सध्या दक्षिण श्रीलंका आणि आग्नेय म्यानमार येथे स्थिरावलेला आहे. पण पुढील काही दिवसांत तो पुढे सरकण्याची शक्यता असून पुढील आठवड्यात केरळमध्ये पोहोचण्याची अपेक्षा आहे.
रेड अलर्ट : अकोला, अमरावती व वर्धा.
ऑरेंज : नागपूर, यवतमाळ व चंद्रपूर.
ऑरेंज : अकोला, अमरावती, वर्धा आणि अमरावती या जिल्ह्यांत ऑरेंज अलर्ट.
कुठे किती पारा…
वर्धा ४७.१°
नागपूर ४६.६°
अमरावती ४६.४°
चंद्रपूर ४६.२°
अकोला ४५.२°
यवतमाळ ४५.२°
गोंदिया ४४.९°
वाशिम ४२.६°
जळगाव ४२.१°
छ. संभाजी नगर ४१.६°
मालेगाव ४१.६°
बुलडाणा ४१°
बीड ४०.४°

उन्हात तडफडून… ; मनोज जरांगे निर्णयावर ठाम, सरकारला दिला शेवटचा इशारा…
डोक्यावर भगवा रुमाल, खाली बाज टाकली, रखरखत्या उन्हात मनोज जरांगेचं उपोषण ; सरकारची नवीन पाच आश्वासने कोणती..?
पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….