तामिळनाडूच्या ‘विजय’ सरकारमध्ये कोण होणार मंत्री..? २३ जणांची यादी आली समोर…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
चेन्नई :- “तामिळनाडूच्याराजकारणातील अत्यंत महत्त्वाचा आणि बहुप्रतीक्षित क्षण अखेर उजाडला आहे. अभिनेता ते राजकारणी बनलेल्या सी. जोसेफ विजय यांच्या ‘तमिळगा वेट्टी कझगम’ पक्षाचे सरकार राज्यात स्थापन झाल्यानंतर आता मंत्रिमंडळाचा अधिकृत विस्तार होत आहे.
मुख्यमंत्री विजय यांनी २३ आमदारांचा मंत्रीपरिषदेत समावेश करण्याची केलेली शिफारस राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर यांनी मान्य केली. या नव्या मंत्र्यांचा शपथविधी सोहळा गुरुवारी (२१ मे २०२६) सकाळी १०:०० वाजता चेन्नई येथील लोक भवन येथे पार पडणार आहे.
भविष्यातील राजकीय रणनीती आणि प्रादेशिक संतुलनाचा विचार करून या मंत्रिमंडळाची रचना करण्यात आली. या यादीमध्ये जुन्या अनुभवी चेहऱ्यांसह अनेक नव्या आणि तरुण आमदारांना संधी देण्यात आली. राजकीय वर्तुळात आधीपासूनच चर्चेत असलेले विनोद, बालाजी, संपत, विघ्नेश, जेगडेश्वरी, राजकुमार, मेरी विल्सन, पार्थिवन, रणजीत कुमार, गांधीराज, विजयालक्ष्मी आणि कुमार या नावांवर अखेर शिक्कामोर्तब करण्यात येईल.

राजकीय विश्लेषकांचे मत
तामिळनाडूच्या राजकीय इतिहासात या मंत्रिमंडळ विस्ताराला अत्यंत महत्त्वाची वाटचाल मानले जात आहे. मुख्यमंत्री विजय यांनी आगामी निवडणुका आणि राज्यातील विविध भागांतील प्रतिनिधित्व लक्षात घेऊन मंत्रिमंडळात नेत्यांना स्थान दिले आहे. लोक भवन येथे होणाऱ्या या दिमाखदार सोहळ्याकडे आता संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.

भारताचा मोठा शत्रू, पुलवामा हल्ल्याचा मास्टरमाइंड हमाजाचा POK मध्ये खात्मा….
राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चेला कायमचा ब्रेक..? शरद पवारांच्या बैठकीनंतर बड्या नेत्यांकडून मोठा खुलासा….
उष्णतेच्या लाटेचा रेड अलर्ट तर कुठे पावसाचा इशारा, वर्धा ४७.१, नागपूर ४६.६ अंशांवर…
“एकतर ठोस करार करा, नाहीतर…” ट्रम्प यांनी इराणला दिला अंतिम इशारा ; आखातात युद्धाचे ढग..!
शेतकरी कर्जमाफीचे पैसे लवकरच खात्यात जमा होणार, अधिकाऱ्यांच्या रजा-सुट्या रद्द ; युद्ध पातळीवर काम करण्याच्या सूचना….
राष्ट्रवादीचे 22 आमदार फुटणार..?