रशियन तेल खरेदीची सूट अमेरिकेकडून रद्द, भारतात पेट्रोल आणि डिझेलचे दर पुन्हा वाढण्याचं संकट…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नवी दिल्ली :- “अमेरिका आणि इराण यांच्यातील संघर्षामुळं जगभरातील तेल पुरवठ्यावर मोठा परिणाम झाला आहे. अमेरिकेनं हल्ला केल्यानं इराणकडून होर्मुझची सामुद्रधुनी बंद करण्याचा निर्णय घेतला.
मात्र, अमेरिका आणि इराण यांच्यात शस्त्रसंधी झाल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी दबावतंत्राचा वापर म्हणून होर्मुझची नाकेबंदी केली. अमेरिका आणि इराण यांच्यातील संघर्षाच्या काळात रशियन तेल खरेदीवर अमेरिकेकडून सूट देण्यात आली होती. मात्र, आता डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियन तेल खरेदीवर दिलेली सूट वाढवण्यास नकार दिला आहे. यामुळं पेट्रोल आणि डिझेल यासह इतर इंधनांचे दर वाढू शकतात. कच्चा तेलाच्या दरात वाढ झाल्यानं भारतासह जगभरात महागाई वाढण्याचं संकट वाढलं आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनानं रशियन तेल खरेदीवर दिलेली अस्थायी सूट वाढवण्यास नकार दिला आहे. आता ही सूट रद्द झाली आहे. हा भारतासाठी मोठा धक्का मानला जातोय. आखाती देशातील संकट आणि होर्मुझच्या सामुद्रधुनीतील तणावामुळं भारत रशियाकडून सातत्यानं तेल खरेदी आहे.
जागतिक तेल बाजारावर तणाव वाढणार
रशिया जगातील मोठ्या कच्चा तेलाच्या निर्यातदार देशांपैकी एक आहे. अमेरिकेच्या या निर्णयानंतर जागतिक बाजारात तेलाचा पुरवठा प्रभावित होऊ शकतो. जगभरात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात आणि इतर इंधनाच्या दरात वाढ होऊ शकते. तज्ज्ञांच्या मतानुसार जर कच्चा तेलाचे दर दीर्घकाळ वाढलेले राहिल्यास याचा थेट परिणाम सर्वसामान्य लोकांच्या खिशावर पडू शकतो.
रशिया-यूक्रेन युद्धामुळं निर्बंध
रशिया आणि यूक्रेन यांच्यातील युद्धानंतर अमेरिका आणि यूरोपियन देशांनी रशियावर कठोर निर्बंध लादले होते. मात्र, मार्च 2026 मध्ये इराण युद्ध सुरु झाल्यानं आणि होर्मुझ बंद झाल्यानं जागतिक बाजारा तेल संकट गडद झालं आहे. तेलाच्या तुटवड्यामुळं ट्रम्प सरकारनं मार्च 2026 मध्ये सूट दिली होती, ती सूट 16 मे पर्यंत वाढवण्यात आली आहे. ही सूट ज्या तेलाच्या पुरवठ्यावर होती, जी पहिल्यापासून टँकरमध्ये लोड केलेलं होतं.
यूरोपियन देशांच्या विरोधामुळं सूट रद्द
अमेरिकेनं रशियन तेल खरेदीवर दिलेली सूट रद्द करावी यासाठी यूरोपियन देश आक्रमक झाले होते. रशिया तेल विक्रीतून मिळालेल्या पैशांचा वापर यूक्रेनविरोधात वापरत असल्याचा दावा यूरोपियन देश करत आहेत. या दबावामुळं ट्रम्प प्रशासनाकडून शनिवारी रशियन तेलावरील सूट रद्द केली.
भारतानं वाढवेली रशियन तेल खरेदी
रिपोर्टनुसार मार्च 2026 मध्ये होर्मुझच्या सामुद्रधुनीवरुन तणाव वाढल्यानं भारतानं रशियाकडून तेल खरेदी वाढवली होती. मार्च 2026 मध्ये प्रतिदिन साडेचार दशलक्ष बॅरल तेल आयात केलं होतं. यामध्ये जवळपास 50 टक्के तेल रशियाकडून खरेदी केलं होतं. एप्रिलमध्ये भारतानं रशियाकडून सर्वाधिक तेल खरेदी केलं. मात्र, ते मार्चच्या तुलनेत एप्रिलमध्ये 20 टक्क्यांनी कमी होतं.

विदर्भाला उष्णतेच्या लाटेचा चटका, अकोला-वर्धा ४६ अंशावर ; चार दिवस “यलो अलर्ट”
“साहेब काहीतरी करा, पक्षात राहणं कठीण…” अजित पवार गटाच्या आमदारांचे थेट शरद पवारांना फोन; महाराष्ट्रात मोठा भूकंप..?
जेवढं मुख्यमंत्री म्हणून मी आणि एकनाथ शिंदेंनी मराठा समाजासाठी केलं, ते महाराष्ट्रातील इतर सरकारांकडून झालं असं वाटत नाही :- देवेंद्र फडणवीस….
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची सुनावणी करणाऱ्या न्यायाधीशांची बदली, त्यांच्याजागी आलेले जज पुलाते कोण..?
सुनील तटकरे, प्रफुल पटेलांचं राष्ट्रवादीतील भविष्य काय..? पक्षाकडून अखेर खुलासा, रोहित पवारांवर गंभीर आरोप….
निर्यात बंदीमुळे देशातील साखर उद्योगासमोर संकट ; हर्षवर्धन पाटील यांची माहिती ; आंतरराष्ट्रीय पातळीवर परिणाम होणार….!
रशियन तेल खरेदीची सूट अमेरिकेकडून रद्द, भारतात पेट्रोल आणि डिझेलचे दर पुन्हा वाढण्याचं संकट…