सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची सुनावणी करणाऱ्या न्यायाधीशांची बदली, त्यांच्याजागी आलेले जज पुलाते कोण..?
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
बीड :- “बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील सुनावणीवर परिणाम करणारा महत्त्वाचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने घेतला आहे. राज्यातील जिल्हा व सत्र न्यायाधीशांच्या नियमित बदल्यांचे आदेश उच्च न्यायालयाने जारी केले असून, त्यानुसार बीड येथील विशेष मकोका न्यायाधीश न्या.व्ही एच पटवदकर यांची बदली संगमनेर येथे करण्यात आली आहे.
न्या. पटवदकर यांच्या न्यायालयात सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची मागील वर्षभरापासून सुनावणी सुरू होती. या प्रकरणात आरोपींवर दोषारोप निश्चिती पूर्ण झाली असून, काही आरोपींनी या दोषारोपाला मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात आव्हान दिले आहे.
गेली वर्षभर व्ही एच पटवदकर यांच्या न्यायालयात संतोष देशमुख हत्या प्रकरणाची सुनावणी
न्या. व्ही एच पटवदकर यांची संगमनेर येथे बदली झाल्यामुळे संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पुढील सुनावणी आता नवीन न्यायाधीशांसमोर होणार आहे. बदली करण्यात आलेल्या सर्व न्यायाधीशांना सुट्टीकाळात त्यांच्या बदलीच्या ठिकाणी तात्काळ रूजू होण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
न्या. पटवदकर यांच्या जागी न्या. जे आर पुलाते यांची नियुक्ती
न्या. पटवदकर यांच्या बदलीनंतर बीड येथील न्यायालयात धुळे येथून न्या. जे आर पुलाते यांची नियुक्ती करण्यात आली आहे. न्या. जे आर पुलाते यांनीही त्यांच्या सेवा काळात अनेक महत्त्वाच्या घटनांवर निकाल दिला आहे.
संतोष देशमुख यांचे हत्या प्रकरण, वाल्मिक कराड मुख्य सूत्रधार
बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची डिसेंबर २०२४ साली अमानुषपणे हत्या करण्यात आली. संतोष देशमुख हत्या प्रकरणात सध्या वाल्मिक कराडसह नऊ आरोपी अटकेत आहेत. सीआयडी आणि एसआयटीने प्रकरणाची चौकशी केली. या प्रकरणात आरोपींवर दोषारोप निश्चिती पूर्ण झाली आहे. या प्रकरणात कृष्णा आंधळे नामक आरोपी फरार आहे. या हत्येचा कट रचल्याचा आरोप धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड याच्यावर ठेवण्यात आला असून, तो सध्या अटकेत आहे. राज्य सरकारने या प्रकरणाच्या चौकशीसाठी सेवानिवृत्त न्यायाधीश एम. एल. ताहलियानी यांच्या अध्यक्षतेखाली एकसदस्यीय न्यायालयीन समिती गठीत केली होती.

जेवढं मुख्यमंत्री म्हणून मी आणि एकनाथ शिंदेंनी मराठा समाजासाठी केलं, ते महाराष्ट्रातील इतर सरकारांकडून झालं असं वाटत नाही :- देवेंद्र फडणवीस….
सुनील तटकरे, प्रफुल पटेलांचं राष्ट्रवादीतील भविष्य काय..? पक्षाकडून अखेर खुलासा, रोहित पवारांवर गंभीर आरोप….
निर्यात बंदीमुळे देशातील साखर उद्योगासमोर संकट ; हर्षवर्धन पाटील यांची माहिती ; आंतरराष्ट्रीय पातळीवर परिणाम होणार….!
महावितरणचे दोन तुकडे…! महाराष्ट्रात शेतकऱ्यांसाठी स्थापन झाली स्वतंत्र वीज कंपनी….
पुढील ४ दिवस महाराष्ट्रात तुफान पाऊस ; ‘या’ जिल्ह्यांना दिला इशारा…
शेतकऱ्यांना कर्ज न देणाऱ्या बँकांवर आता थेट गुन्हा दाखल होणार, महसूलमंत्र्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश….
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची सुनावणी करणाऱ्या न्यायाधीशांची बदली, त्यांच्याजागी आलेले जज पुलाते कोण..?