“साहेब काहीतरी करा, पक्षात राहणं कठीण…” अजित पवार गटाच्या आमदारांचे थेट शरद पवारांना फोन; महाराष्ट्रात मोठा भूकंप..?
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- “महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात मोठ्या घडामोडींना वेग आला आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील आमदारांमध्ये गेल्या काही दिवसांपासून प्रचंड अस्वस्थता पसरली आहे.
या अस्वस्थेतून काही आमदारांनी थेट राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याशी फोनवरून संपर्क साधल्याची खात्रीलायक माहिती सूत्रांनी दिली आहे. “साहेब, सध्याच्या राजकीय परिस्थितीत पक्षात राहणे कठीण झाले आहे, आता तुम्हीच काहीतरी करा,” असे साकडे या आमदारांनी शरद पवारांना घातल्याचे समजते. पक्षांतर्गत धुसफूस आणि भविष्यातील राजकीय अनिश्चिततेमुळे आमदार कमालीचे चिंतेत आहेत.
अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची धुरा सुनेत्रा पवार यांच्या हाती आली. मात्र, मागील काही राजकीय घटनाक्रमात मोठ्या घडामोडी ठरल्या. राष्ट्रवादी काँग्रेसकडून २९ एप्रिल रोजी केंद्रीय निवडणूक आयोगाला पाठवलेल्या पत्रात प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांच्यासह आणखी काही ज्येष्ठ नेत्यांना डावलण्यात आल्याचे समोर आले. त्यानंतर राष्ट्रवादीत काही आलबेल नसल्याचे समोर आले. राष्ट्रवादीची धुरास सुनेत्रा पवार, त्यांचे चिरंजीव पार्थ पवार आणि जय पवार यांच्याकडे गेली असल्याचे चित्र आहे. त्यातूनच पटेल आणि तटकरे यांचे पंख छाटण्यात आल्याची चर्चा सुरू झाली आहे. अशातच राष्ट्रवादी अजित पवार गटामधील आमदारांची अस्वस्थता वाढली असल्याचे म्हटले जात आहे. तर, दुसरीकडे त्यापैकी काही आमदारांनी शरद पवारांना साद घातल्याची माहिती सूत्रांनी दिली.
साहेब काही तरी करा…या कठिण परिस्थितीत….
राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या आमदारांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांना साकडं घातलं आहे. काही आमदारांनी थेट राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याशी फोनवरून संपर्क साधला. “साहेब, सध्याच्या राजकीय परिस्थितीत पक्षात राहणे कठीण झाले आहे, आता तुम्हीच काहीतरी करा,” असे साकडे घातले आहे. त्यामुळे राष्ट्रवादीत भूकंप होणार का, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
पटेलांनी घेतली भेटीची वेळ पण पोहचले तटकरे…
या सगळ्या घडामोडी सुरू असतानाच, मुंबईत एका मोठ्या गुप्त राजकीय भेटीची नाट्यमय घटना घडली. अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी शरद पवार यांची भेट घेण्यासाठी वेळ मागून घेतली होती. मात्र, या भेटीच्या वेळी सुनील तटकरे देखील येणार आहेत, याची पुसटशी कल्पनाही शरद पवारांना नव्हती, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. सुनील तटकरे हे शरद पवारांच्या निवासस्थानी पोहोचले खरे, मात्र या गुप्त भेटीची कुणकुण प्रसारमाध्यमांना लागली. माध्यम प्रतिनिधींनी तिथे गर्दी केल्याचे पाहून सुनील तटकरे कमालीचे अस्वस्थ झाले. माध्यमांच्या उपस्थितीमुळे निर्माण होणारा राजकीय वाद टाळण्यासाठी तटकरे शरद पवारांशी एकही शब्द न बोलता, तिथून तडकाफडकी निघून गेले.
एकीकडे राष्ट्रीय कार्यकारणीवरून पक्षात आधीच वाद सुरू असताना, आता आमदारांनी थेट शरद पवारांकडे मदतीसाठी लावलेला तगादा यामुळे अजित पवार गटात सर्व काही आलबेल नसल्याचे स्पष्ट झाले आहे. या फोन कॉल्स आणि तटकरेंच्या नाट्यमय परतीमुळे महाराष्ट्रात पुन्हा एकदा मोठ्या राजकीय उलथापालथीचे संकेत मिळत आहेत.

अभिनेत्री उषा चव्हाण यांच्याकडून पुरस्कार परत, पुण्यातील ‘टीडीआर’ प्रकरणी नाराजी ; उपमुख्यमंत्री शिंदेंनी घेतला मोठा निर्णय….!
घड्याळाची टिक टिक सुरु, हालचाल सुरु करा अन्यथा काहीच राहणार नाही, ट्रम्प यांची इराणला धमकी…
सोलापूरचा महेंद्र ‘हिंद केसरी’; थारसह पटकावली चांदीची गदा, पुण्याचा पृथ्वीराज उपविजेता…..
महाराष्ट्र सरकारचा मोठा डिजिटल निर्णय; मंत्रिमंडळ बैठकींना आता ‘ऑनलाईन’ हजेरीची मुभा….
महाराष्ट्रात पुन्हा निवडणुकांचे पडघम; विधानपरिषदेच्या १६ जागांसाठी निवडणूक तारखांची घोषणा, मतदारसंघांची संपूर्ण यादी…
NEET पेपरफुटी प्रकरणात मोठा ट्विस्ट, लातूरमधील नामांकित प्राध्यापक शिवराज मोटेगावकर CBI च्या ताब्यात…