जिल्ह्यात 263 जणांची कोरोनावर मात;सात जणांचा मृत्यु;199 नव्याने पॉझेटिव्ह
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
यवतमाळ, दि. 12 :
वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वार्ड तसेच विविध कोव्हीड केअर सेंटर व कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये भरती असलेले 263 बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. तर गत 24 तासात जिल्ह्यात नव्याने 199 पॉझेटिव्ह आले असून सात कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यु झाला आहे.
मृत झालेल्यांमध्ये सहा पुरुष व एका महिलेचा समावेश आहे. यात पुसद शहरातील 62 वर्षीय पुरुष, वणी तालुक्यातील 71 वर्षीय पुरुष, आर्णि तालुक्यातील 65 वर्षीय पुरुष, पुसद तालुक्यातील 65 वर्षीय पुरुष, दारव्हा तालुक्यातील 65 व 75 वर्षीय पुरुष आणि यवतमाळ तालुक्यातील 25 वर्षीय महिलेचा मृत्यु झाला. तसेच नव्याने पॉझेटिव्ह आलेल्या 199 जणांमध्ये 114 पुरुष व 85 महिला आहेत. यात महागाव शहरातील आठ पुरुष व तीन महिला, महागाव तालुक्यातील एक पुरुष, उमरखेड शहरातील सात पुरुष व पाच महिला, यवतमाळ शहरातील 25 पुरुष व 21 महिला, यवतमाळ तालुक्यातील एक पुरुष, वणी शहरातील 14 पुरुष 18 महिला, पांढरकवडा शहरातील 17 पुरुष व 10 महिला, पांढरकवडा तालुक्यातील आठ पुरुष व पाच महिला, नेर शहरातील चार पुरुष व चार महिला, दारव्हा शहरातील तीन पुरुष, दारव्हा तालुक्यातील तीन पुरुष व दोन महिला, आर्णी शहरातील तीन पुरुष व दोन महिला, आर्णी तालुक्यातील एक पुरुष एक महिला, पुसद शहरातील 10 पुरुष व आठ महिला, पुसद तालुक्यातील दोन पुरुष, झरी शहरातील दोन पुरुष व तीन महिला, कळंब शहरातील दोन पुरुष, कळंब तालुक्यातील एक पुरुष व एक महिला, दिग्रस शहरातील एक पुरुष व दोन महिला व जिल्ह्यातील इतर ठिकाणचा एक पुरुषाचा समावेश आहे.
वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार सद्यस्थितीत जिल्ह्यात 1194 ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह भरती असून होम आयसोलेशनमध्ये 274 जण आहेत. सुरवातीपासून आतापर्यंत जिल्ह्यात एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 5449 झाली आहे. यापैकी 3835 जण बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. तर जिल्ह्यात 145 मृत्युची नोंद आहे. सद्यस्थितीत आयसोलेशन वॉर्डात 287 जण भरती आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने सुरवातीपासून आतापर्यंत 61125 नमुने पाठविले असून यापैकी 58839 प्राप्त तर 2286 अप्राप्त आहेत. तसेच 53390 नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रशासनाने कळविले आहे.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..