MIM नगरसेवक मतीन पटेल कोंडीत..! निदा खान थांबलेल्या घरासह कार्यालयाला मनपाची ‘नोटीस’
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
छ. संभाजीनगर :- “एमआयएम पक्षाचे नगरसेवक मतीन पटेल यांच्या नारेगावातील घरातून आरोपी निदा खानला गुरुवारी अटक करण्यात आली. शनिवारी महापौर समीर राजूरकर यांच्या आदेशानुसार पटेल यांच्या घराला नोटीस चिटकवण्यात आली.
त्यामध्ये प्लॉटच्या मालकी हक्काचे कागदपत्र, बांधकाम परवानगी तीन दिवसांत सादर करावी, असे म्हटले आहे. कागदपत्र सादर न केल्यास इमारत अनधिकृत असल्याचे समजून पाडण्यात येईल, असा इशाराही दिला आहे.
नाशिकच्या टीसीएस कंपनीत काम करणारी निदा खान महिलांचे धर्मांतर करण्याचा प्रयत्न करीत होती, असा आरोप आहे. तिच्यावर नाशिक पोलिसांनी गुन्हा नोंदविला. गत काही दिवसांपासून ती फरार होती. निदा खान छत्रपती संभाजीनगर शहरातील नारेगावात थांबल्याची माहिती नाशिक आणि स्थानिक पोलिसांना मिळाली. दोन दिवसांपूर्वी संयुक्त कारवाई करीत पोलिसांनी निदाला नारेगावातील एका घरातून अटक केली. हे घर एमआयएमचे नगरसेवक मतीन पटेल यांचे असल्याचे समोर आले. त्यामुळे पोलिसांनी त्यांनाही आरोपी केले. एमआयएमचे सर्वेसर्वा खा. असदुद्दीन ओवैसी आणि प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी हे सर्व प्रकरण मीडिया ट्रायल असल्याचे सांगून टाकले. निदा खान निर्दोष सिद्ध होईल, असा दावाही केला.
दरम्यान, भाजपचे महापौर समीर राजूरकर यांनी मतीन पटेल यांच्या घराची संपूर्ण माहिती घ्यावी, असे प्रशासनाला निर्देश दिले. घर अनधिकृत असल्याचे प्राथमिक चौकशीत समोर आले. त्यामुळे दुपारी अतिक्रमण हटाव विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी घराला नोटीस चिटकवली. त्यामुळे या भागात एकच खळबळ उडाली आहे.
नाेटीसमध्ये काय म्हटले ?
मतीन पटेल यांच्या मालकीचे घर नारेगाव भागातील बिस्मिल्ला कॉलनीत आहे. नोटीसमध्ये नमूद केले आहे की, प्लॉट क्रमांक २ येथे सहा खोल्यांचे बांधकाम आहे. त्यात काही दुकाने बांधून त्याचा वाणिज्य वापरही सुरू केला. संपूर्ण बांधकाम अनधिकृत आहे. बांधकाम पाडून टाकण्यापूर्वी आपले म्हणणे तीन दिवसांत सादर करावे. उत्तर दाखल न केल्यास निकाल एकतर्फी काढण्यात येईल.
घर अनधिकृत असेल तर…
मतीन पटेल यांनी मनपा निवडणूक लढविताना शहरात माझ्या नावावर कुठेही अनधिकृत बांधकाम नाही, असे शपथपत्र सादर केले आहे. आता त्यांच्या नावावर हे अनधिकृत असल्याचे सिद्ध झाल्यास अपात्रतेची दुसरी नवीन टांगती तलवार येईल.
नारेगावातील कार्यालय अनधिकृत?
मनपाकडून आणखी एक नोटीस
नगरसेवक मतीन पटेल यांचा नारेगावातील १८०० चौरस फुटांचा प्लॉट असून, चारही बाजूंनी वॉल कंपाउंड केले आहे. या जागेत त्यांनी कार्यालयही उभारले. संबंधित कार्यालयदेखील अनधिकृत असल्याचा सुगावा महापालिकेला लागल्यानंतर रविवारी रात्री उशिरा महापालिकेच्या पथकाने कार्यालयाला आणखी एक नोटीस चिकटवली.

राष्ट्रवादीत मोठा भूकंप..! प्रफुल्ल पटेल, तटकरे आणि भुजबळांना डच्चू..? कार्यकारणीच्या नवीन यादीने राजकीय वर्तुळात खळबळ….
ममतांसह इतरांनी नव्याने याचिका करावी, विजयी मतांच्या फरकावरून सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा….
राष्ट्रवादीतून प्रफुल्ल पटेल पदच्युत ; राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्रा पवार यांच्या नव्या पत्रातून शिक्कामोर्तब….
विदर्भात उन्हाचं ‘तांडव’ ; तरुण शेतमजुर दगावला ; 350 हून अधिक उष्माघाताचे रुग्ण, प्रशासनाकडून हाय अलर्ट….
महाराष्ट्र सरकारचे कॉस्ट कटींगचे ३ नियम लागू, अधिकाऱ्यांच्या खर्चावर चाप; पंतप्रधान मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद….
चिकन प्रेमींनो सावधान..! राज्यात बर्ड फ्लूचं थैमान, नंदुरबारमध्ये आतापर्यंत 4 लाख कोंबड्या, 21 हजार अंडी केली नष्ट….
MIM नगरसेवक मतीन पटेल कोंडीत..! निदा खान थांबलेल्या घरासह कार्यालयाला मनपाची ‘नोटीस’