ऐतिहासिक विजय! सुनेत्रा पवारांनी सर्व विक्रम मोडले, तब्बल इतक्या मतांनी दणदणीत विजय….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- “महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातील अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या बारामती विधानसभा पोटनिवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला आहे. महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांनी ऐतिहासिक विजय नोंदवला आहे.
केवळ विजयच नाही, तर सुनेत्रा वहिनींनी राज्याच्या निवडणूक इतिहासातील आतापर्यंतचे सर्व विक्रम मोडीत काढत एक नवा मैलाचा दगड प्रस्थापित केला आहे.
अजितदादांचाही रेकॉर्ड मोडीत!
बारामती हा पवार कुटुंबाचा अभेद्य बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे ही जागा रिक्त झाली होती. यापूर्वी अजित पवार यांनी याच मतदारसंघातून १ लाख ६५ हजार मताधिक्यांचा विक्रम प्रस्थापित केला होता. मात्र, सुनेत्रा पवार यांनी आजच्या निकालात हा आकडा खूप मागे टाकला आहे. ताज्या आकडेवारीनुसार, सुनेत्रा पवार यांनी तब्बल २,१८,९३० मतांच्या प्रचंड फरकाने विजय मिळवला आहे. पोटनिवडणुकीच्या इतिहासात इतक्या मोठ्या मताधिक्याने निवडून येणाऱ्या त्या पहिल्या महिला उमेदवार ठरल्या असाव्यात, असा अंदाज वर्तवला जात आहे.
राहुरीतही भाजपचा गुलाल
बारामतीसोबतच राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीचा निकालही समोर आला आहे. भाजपचे आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनानंतर त्यांचे पुत्र अक्षय कर्डिले रिंगणात होते. राहुरीच्या मतदारांनी आपल्या लाडक्या नेत्याच्या मुलावर विश्वास दाखवत अक्षय कर्डिले यांना मोठ्या मताधिक्याने विजयी केले आहे. वडिलांचा राजकीय वारसा पुढे नेण्यात अक्षय कर्डिले यशस्वी ठरले असून, राहुरीमध्ये भाजपचा ‘कमळ’ पुन्हा एकदा जोमाने फुलले आहे.
नव्या पर्वाची सुरुवात
सुनेत्रा पवार यांच्या या विजयाने बारामतीच्या राजकारणात एका नव्या पर्वाची सुरुवात झाली आहे. २ लाखांहून अधिक मताधिक्य मिळवणे ही केवळ लाट नसून सुनेत्रा वहिनींच्या नेतृत्वावर जनतेने दिलेली मोठी मोहोर आहे. या विजयानंतर बारामती आणि राहुरी दोन्ही ठिकाणी कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी आणि गुलालाची उधळण करत जल्लोष साजरा केला आहे. राज्यातील या दोन महत्त्वपूर्ण पोटनिवडणुकांच्या निकालांनी आगामी मुख्य विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीचा आत्मविश्वास द्विगुणित केला आहे.

पश्चिम बंगालच्या निवडणुकीतील सर्वात धक्कादायक निकाल, मुस्लीमबहुल मतदारसंघात भाजपचा उमेदवाराचा विजय..?, मालद्यातही भाजपची लाट….
मोदी-शहांचे स्वप्न पूर्णत्वाकडे..! बंगालमध्ये भाजपने पार केला बहुमताचा आकडा; २ दशकांनंतर सत्तांतर, ममतांना मोठा धक्का….
तृणमूल काँग्रेस पराभवाच्या उंबरठ्यावर, ममता बॅनर्जी हताश , कार्यकर्त्यांना केलं असं आवाहन….
पंतप्रधान नरेंद्र मोदी साधणार जनतेशी संवाद, निवडणुकांच्या ऐतिहासिक निकालावर काय बोलणार..?
आसनसोलमध्ये तृणमूलच्या कार्यालयात तोडफोड, बॉम्ब सापडला; ममता बॅनर्जींच्या घराबाहेर ‘जय श्री राम’च्या घोषणा….
पश्चिम बंगाल असो की आसाम, पाच राज्यांच्या निवडणुकीत काँग्रेसची नाचक्की ; फक्त ‘या’ राज्याने राखली अब्रू….
ऐतिहासिक विजय! सुनेत्रा पवारांनी सर्व विक्रम मोडले, तब्बल इतक्या मतांनी दणदणीत विजय….