बारामती पोटनिवडणुकीतून काँग्रेसची माघार, हर्षवर्धन सपकाळ यांची माहिती; कुणालाही पाठिंबा दिला नसल्याचंही केलं जाहीर….

पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- “बारामतीच्या पोटनिवडणुकीतून काँग्रेसने माघार घेतली आहे. काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर बारामतीची पोटनिवडणूक जाहीर झाली.
ही पोटनिवडणूक २३ एप्रिल रोजी होणार आहे. या निवडणुकीत काँग्रेसने उमेदवार दिला होता. दरम्यान काँग्रेस आज काय करणार हे पाहणं महत्त्वाचं होतं कारण आज अर्ज मागे घेण्याची मुदत होती. आज अपेक्षेप्रमाणे काँग्रेसने माघार घेतली आहे.
हर्षवर्धन सपकाळ काय म्हणाले?
बारामती आणि राहुरीच्या पोटनिवडणुका महाराष्ट्रात आहेत. बारामतीकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. वैचारिक भूमिका म्हणून, भाजपाला असणारा विरोध करत असताना आणि निवडणूक आयोग भाजपाची बी टीम असल्याने आम्ही उमेदवार दिला होता. बारामती आणि राहुरी या ठिकाणी आम्ही अर्ज भरला होता. १५ मार्चला आम्ही ती भूमिका घेतली होती. आकाश मोरेंनी हा अर्ज बारामतीसाठी भरला होता. मित्र पक्ष निवडणूक लढवत नसल्याने आम्ही हा निर्णय घेतला. ६ एप्रिलला आम्ही अर्ज दाखल केला होता. अजित पवार हे महाराष्ट्राचे मोठे नेते होते. त्यांचं अपघाती निधन महाराष्ट्राला चटका लावणारं आहे. त्यामुळे आम्हाला जी भावनिक साद देण्यात आली त्याचा विचार आम्ही केला. या निवडणुकीत काँग्रेसने उमेदवार देऊ नये म्हणून आम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने विनंती केली. सुनेत्रा पवार यांनी फोन केला होता. बुधवारीही त्यांनी फोन केला होता. अजित पवारांशी काँग्रेसचं असलेलं जे नातं होतं त्या भावना त्यांनी व्यक्त केल्या, आजही संपर्क केला. अजित पवार राष्ट्रवादी पक्षाचे विविध नेतेही आम्हाला भेटले. छगन भुजबळ यांनीही फोन करुन कळकळीने उमेदवार मागे घेण्याची विनंती केली. धनंजय मुंडे यांनीही फोनवरुन आम्हाला विनंती केली. ज्यानंतर आम्ही बारामतीच्या पोटनिवडणुकीतून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे.
विविध नेत्यांनी आमच्याशी संपर्क साधला, भावनिक साद घातली
आमच्या विविध नेत्यांशी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी संपर्क साधला. तसंच आज रोहित पवार हे आमच्या मित्र पक्षाचे नेतेही आले. या निवडणुकीत अजित पवारांसाठी तुमची सहकार्याची भावना असू द्या असं त्यांनी सांगितलं. काँग्रेसने अजितदादांच्या अपघाताबाबत जी भूमिका घेतली त्याचंही रोहीत पवार यांनी समर्थन केलं. काही हास्यास्पद वक्तव्य, अपरिपक्व वक्तव्यंही आमच्या विरोधात करण्यात आली. पण रोहित पवार यांनी त्याबाबतही कुटुंब म्हणून दिलगिरी व्यक्त केली. सुप्रिया सुळे यांनीही त्यांच्या भावना बोलून दाखवल्या, शरद पवार यांनीही आम्हाला सल्ला दिला. पक्षश्रेष्ठींशीही त्यांचं बोलणं झालं. त्यांच्या भावनाही आम्हाला समजली. या सगळ्या गोष्टींसह आमची वरिष्ठ नेत्यांशी आमची चर्चा झाली. ही निवडणूक लढलीच पाहिजे अशी आमची भूमिका होती. पण सामंजस्य, सभ्यता आणि संस्कृती म्हणून आम्हाला जी साद घातली गेली. अजितदादा काँग्रेस पक्षासह दीर्घकाळ होते ही बाबही आम्ही विचारात घेतली. या सगळ्या पार्श्वभूमीवर जो विचार समोर आला त्यानुसार आम्ही बारामतीच्या पोटनिवडणुकीतून माघार घेतली आहे असं हर्षवर्धन सपकाळ यांनी सांगितलं आहे. आमचा उमेदवार बारामतीत उभा राहणार नाही. आमच्या उमेदवाराची माघार आम्ही घेत आहोत. सभ्यता आणि संस्कृती पाळून आम्ही हा निर्णय घेतला आहे.

उन्हात तडफडून… ; मनोज जरांगे निर्णयावर ठाम, सरकारला दिला शेवटचा इशारा…
डोक्यावर भगवा रुमाल, खाली बाज टाकली, रखरखत्या उन्हात मनोज जरांगेचं उपोषण ; सरकारची नवीन पाच आश्वासने कोणती..?
पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….