दोन्ही राष्ट्रवादींच्या विलनीकरणाच्या मुद्द्याला पूर्णविराम..? शरदचंद्र पवार पक्ष ॲक्शन मोडमध्ये, बैठका अन् गाठीभेटींना वेग….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- “राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विलनीकरणच्या मुद्द्याला पूर्णविराम मिळाल्याच्या चर्चा आहे. गेल्या ३ दिवसांपासून मुंबईमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची संघटनात्मक बैठका सुरू आहेत.
या बैठकीत प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे आणि राष्ट्रीय कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे यांच्याकडून विलनीकरण ह्या मुद्द्याकडे लक्ष न देता आपला पक्ष राज्यात कशाप्रकारे मजबूत होईल, संघटना कशा प्रकारे वाढेल याकडे लक्ष देण्याच्या पदाधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. पुढील वर्षभराच कार्यक्रमांचे नियोजन करावे, सर्वसामान्यांच्या प्रश्नावर आवाज उठवण्याच्या देखील सूचना देखील देण्यात आल्या आहेत. मे महिन्यात जिल्हाध्यक्ष त्यानंतर राज्यातील सर्व तालुकाध्यक्ष यांच देखील शिबिर होणार असल्याची पदाधिकाऱ्याना माहिती आहे. आज देखील बलार्ड पीअर येथील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या संघटनात्मक बैठका घेण्यात येणार आहेत. आज मुंबई विभागाची आढावा बैठक ही प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे आणि राष्ट्रीय कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे.
सक्षम अशा कार्यकर्त्यांच्या आम्ही नियुक्त करत आहोत
तर पक्षाच्या बैठकांबाबत शरद पवारांच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं की, ‘गेल्या काही दिवसापासून पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी प्रक्रिया सुरू आहेत, गेल्या आठवड्यात संपूर्ण जिल्ह्याच्या बैठक आम्ही घेतल्या. सुप्रिया ताई यांच्या उपस्थितीत प्रत्येक सेलच्या बैठका सुरू आहेत. मुंबईला सेलची बैठक होणार आहे. सक्षम अशा कार्यकर्त्यांच्या आम्ही नियुक्त करत आहोत. महाराष्ट्रभर दौरे आम्ही करणार आहोत. महाराष्ट्रात जे मुद्दे आहेत, त्यावर आक्रमकतेने रस्त्यावर उतरणारा पक्ष म्हणून आम्ही पुढे येणार आहोत. पक्षाच्या मागे कार्यकर्ता हा सक्षमपणे आजही उभा आहे. निवडणुकीच्या प्रक्रिया सातत्याने लागल्यामुळे पक्ष संघटनेच्या बाबतचे निर्णय प्रलंबित होते. राज्याची बॉडी जिल्ह्याची बॉडी या सगळ्याचा आढावा आम्ही घेतला आहे. आढावा घेत असताना काही जिल्हा पातळीवरचे बदल करण्याच्या सूचना मी केले आहेत. राज्य पातळीवरच्या बदलाबाबत सर्वजण बसून आम्ही निर्णय घेणार आहोत, असंही त्यांनी सांगितलं आहे.
बारामती पोटनिवडनुकीच्या अनुषंगाने मोठी अपडेट
आमदार रोहित पवार यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची भेट घेतली. बारामती पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज माघारी घेण्याचा आज शेवटचा दिवस आहे, ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत. तर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची भेट घेतल्यानंतर याबाबत बोलताना रोहित पवारांनी म्हटलं की, अर्ज मागे घेण्यासाठी अवघे काही तास असताना ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी मी आलो. बाकीचे जे सत्तेत आहेत त्यांना वाटत असेल आपण काही करू शकतो, तसे नसते. काही गोष्टी चर्चेअंती सोडायच्या असतात. पार्थ यांनी दोन दिवसांपूर्वी केलेले वक्तव्य चुकीचे होते. मला बाकींच्याविषयी माहित नाही, मी दादांच्या प्रेमापोटी आलो आहे. महाराष्ट्राची राजकीय संस्कृती जपावी यासाठी विनंती केली. अर्थात काॅंग्रेसकडून सपकाळ यांनी वरिष्ठांशी चर्चा करून अर्ज मागे घेतील अशी आशा असल्याची प्रतिक्रिया रोहित पवार यांनी दिली आहे.
रोहित पवारांनी महाराष्ट्र काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथलांशी चर्चा
आमदार रोहित पवार यांनी महाराष्ट्र काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्याशी चर्चा केली. बारामती विधानसभेच्या पोटनिवडणुकीतून काँग्रेसने माघार घ्यावी अशी विनंती केली आहे. पक्ष श्रेठींना विचारून या संदर्भातील निर्णय कळवण्यात येईल असं मत रमेश चेन्नीथला यांनी व्यक्त केलं आहे.

हाजी रफीक अहेमद लोहार नगर परिषद उर्दू उच्च प्राथमिक शाळा क्रं २ पुसद येथे सामाजिक अंकेक्षण निरीक्षण ; ग्राम व जिल्हा साधन व्यक्तींची भेट….
माळपठार भागातील रस्त्याकरिता सार्वजनिक बांधकाम विभागाला पुसद काँग्रेसचे “अल्टीमेटम”
बारामतीमधून काँग्रेसची माघार, विजय वडेट्टीवार यांनी स्पष्टच सांगितले, ‘आमच्या वरिष्ठांशी…’
बारामतीच्या पोटनिवडणुकीबाबत काँग्रेसचा मोठा निर्णय..? रोहित पवार आणि हर्षवर्धन सपकाळ यांच्या भेटीत काय घडलं..?
अवकाळीबाधीत शेतकऱ्यांना सरकारचा मोठा दिलासा ; आर्थिक मदत केली जाहीर….
बारामती पोटनिवडणुकीतून काँग्रेसची माघार ; हर्षवर्धन सपकाळ यांची घोषणा, फडणवीसांचा तो शब्दही सांगितला..!