दिग्रस बायपास व वाशिम रिंग रोडसाठी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची खासदार संजय देशमुख यांनी घेतली भेट….

पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
पुसद :- यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघातील वाढत्या वाहतूक समस्यांचा विचार करून दिग्रस शहरासाठी बायपास तसेच वाशिम शहरासाठी रिंग रोड उभारणीसंदर्भात खासदार संजय देशमुख यांनी नितीन गडकरी यांना निवेदन देत यवतमाळ व वाशिम जिल्ह्यातील विविध महत्त्वाच्या रस्त्यांसाठी CRF (Central Road Fund) अंतर्गत प्रस्तावही सादर केले.
दिग्रस शहरामध्ये दिवसेंदिवस वाहतुकीचा ताण वाढत असून त्यामुळे वारंवार ट्रॅफिक जाम, अपघातांचा धोका आणि प्रदूषण यांसारख्या समस्या निर्माण होत आहेत. विशेषतः जड वाहनांची शहरातून होणारी वाहतूक नागरिकांसाठी मोठी अडचण ठरत आहे. त्यामुळे मानोरा बायपासपासून दारव्हा रोडला जोडणारा राष्ट्रीय महामार्ग NH-161A ते NH-361C दरम्यान बायपास मंजूर करणे अत्यंत आवश्यक आहे. या प्रस्तावित बायपाससाठी ब्रिटिशकालीन रेल्वेची उपलब्ध जमीन असल्यामुळे मोठ्या प्रमाणात जमीन अधिग्रहणाची गरज भासणार नाही आणि प्रकल्प कमी खर्चात व लवकर पूर्ण होऊ शकतो.तसेच वाशिम शहरातील वाढत्या वाहतुकीचा विचार करून शहराभोवती पूर्ण रिंग रोड विकसित करण्याचीही मागणी करण्यात आली आहे. सध्या राष्ट्रीय महामार्ग NH-161 (अकोला-हिंगोली मार्ग) वर वाशिमसाठी बायपास उपलब्ध असला तरी इतर दिशांनी येणारी वाहतूक अद्याप शहरातूनच जाते. त्यामुळे शहरात वाहतुकीचा ताण व जामची समस्या वाढत आहे.
प्रस्तावित रिंग रोड NH-161 (अकोला दिशेकडून) सुरू होऊन पुढे NH-161E व राज्य महामार्ग 183 (मंगरूळपीर -पुसद मार्ग) यांना जोडत पुन्हा NH-161 (हिंगोली दिशेकडे) जोडण्याचा प्रस्ताव देण्यात आला आहे. हा रिंग रोड झाल्यास वाशिम शहराभोवती पूर्ण वाहतूक वळवता येईल व शहरातील वाहतूक सुरळीत होण्यास मोठी मदत होईल.
या दोन्ही प्रकल्पांमुळे शहरातील वाहतुकीचा ताण कमी होईल, अपघातांचे प्रमाण घटेल तसेच अकोला, हिंगोली, पुसद आणि मंगरूळपीर या भागांतील प्रवास अधिक सुरक्षित व जलद होईल.
याशिवाय यवतमाळ व वाशिम जिल्ह्यातील अनेक महत्त्वाच्या रस्त्यांच्या विकासासाठी Central Road Fund (CRF) अंतर्गत प्रस्ताव सादर करण्यात आले असून या रस्त्यांना मंजुरी मिळाल्यास ग्रामीण भागातील संपर्क व्यवस्था मोठ्या प्रमाणात सुधारेल. असे संजय देशमुख खासदार यवतमाळ वाशिम लोकसभा यांनी सांगीतले.

गोवंश तस्करांनी केली बजरंग दल कार्यकर्त्याची दगडांनी ठेचून निर्घृण हत्या ; सुकळी गावात मध्यरात्री घडला काळजाचा थरकाप उडवणारा प्रकार…
लडाखमध्ये लष्कराचे ‘चीता’ हेलिकॉप्टर डोंगराला धडकले, मेजर जनरल थोडक्यात बचावले; दोन्ही पायलट जखमी….
कॉकरोच जनता पार्टीवर कारवाई; एक्स, इन्स्टानंतर वेबसाईटवरही बंदी…
पेट्रोल-डिझेलच्या किमतीत पुन्हा वाढ, चेक करा नवे दर…
दहावी पास विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी, बोर्डाने घेतला मोठा निर्णय…
उद्धव ठाकरेंनी फसवलं..? बच्चू कडू यांचा खळबळजनक गौप्यस्फोट…