हिवरा येथे २८ फेब्रुवारीपासून ‘विदर्भ हिंद केसरी’ भव्य शंकरपटाचा थरार…! ; चार लाख रुपयांच्या बक्षिसांची भव्य लूट….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
हिवरा संगम :- महागाव तालुक्यातील हिवरा (सं) येथे स्व. धोंडीरावजी पाटील, स्व. दादारावजी रंभाजी कदम आणि स्व. ब्रिजलाल जयस्वाल यांच्या स्मृतीप्रित्यर्थ ‘विदर्भ हिंद केसरी’ भव्य जंगी शंकरपटाचे आयोजन करण्यात आले आहे. हा भव्य सोहळा २८ फेब्रुवारी ते २ मार्च २०२६ या कालावधीत पार पडणार असून, विदर्भातील बैलगाडा शौकिनांसाठी ही एक मोठी पर्वणी ठरणार आहे. गेल्या चार वर्षापासून हिवरा येथे राज्यस्तरीय बैलगाडा शर्यतीचे यशस्वी व नियोजनबद्ध आयोजन होत आहे. या स्पर्धेत राज्यातील कानाकोपऱ्यातून नामांकित बैल जोड्या या स्पर्धेसाठी येत असतात. त्यामुळे येथील स्पर्धा अतिशय रंजक आणि रोमांचकारी होते. या संपूर्ण स्पर्धेत जनरल गटात एकूण एकूण 2 लाख 48 हजार रुपयांची तर क गटात एकून लाख 19 हजार रुपयांच्या बक्षिसाची भव्य
लूट होणार आहे.
या शंकरपटात दोन गटांत स्पर्धा रंगणार असून विजेत्यांना भरघोस रोख बक्षिसे देण्यात येणार आहेत:
* जनरल गट: प्रथम पारितोषिक ७१,००० रुपये नितीन भुतडा यांच्या वतीने). या गटात एकूण १५ क्रमांकांपर्यंत बक्षिसे दिली जातील.
* ‘क’ गट: प्रथम पारितोषिक ३१,००० रुपये ( नितीन भुतडा यांच्या वतीने). या गटातही १५ क्रमांकांपर्यंत रोख बक्षिसे व सन्मानचिन्ह दिले जाणार आहे.
या कार्यक्रमाचे उद्घाटन डॉ. राम कदम यांच्या शुभहस्ते होणार असून, यावेळी योगेश वाजपेयी, मुकुंदराव पांडे, डॉ. धोंडीरावजी बोरुळकर यांसह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. बक्षीस वितरण समारंभाला नितीन भुतडा (भा.ज.पा. समन्वयक), आ. किसनराव वानखेडे आणि इतर प्रतिष्ठित नेत्यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
आयोजकांनी स्पर्धेसाठी कडक नियमावली जाहीर केली आहे:
बैलजोडीला काठीने किंवा चाबकाने मारता येणार नाही.
कोणतेही मादक द्रव्य सेवन करून बैलांना आणण्यास सक्त मनाई आहे.
शंकरपट शासनाने नेमून दिलेल्या नियमानुसारच पार पडेल.डॉ. राम कदम यांचे शेतात ही बैलगाडा शर्यत होणार असून या स्पर्धेची प्रवेश फीजनरल गटासाठी – २००० रू. क’ गटासाठी – १००० रू. आहे ‘ROYAL SARJA’ या यूट्यूब चॅनलवर संपूर्ण स्पर्धेचे थेट प्रक्षेपण पाहता येईल.
एकविरा देवी संस्थानतर्फे २८ फेब्रुवारी व १ मार्च रोजी भोजनाची मोफत व्यवस्था करण्यात आली आहे.
या भव्य शंकरपटाचे निमंत्रक साहेबराव कदम पाटील (माजी जि.प. सदस्य) असून, समस्त हिवरा ग्रामस्थ आणि विविध मंडळांच्या सहकार्याने हा उत्सव साजरा होत आहे. परिसरातील नागरिकांनी या चित्तथरारक खेळाचा आनंद घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

गोवंश तस्करांनी केली बजरंग दल कार्यकर्त्याची दगडांनी ठेचून निर्घृण हत्या ; सुकळी गावात मध्यरात्री घडला काळजाचा थरकाप उडवणारा प्रकार…
लडाखमध्ये लष्कराचे ‘चीता’ हेलिकॉप्टर डोंगराला धडकले, मेजर जनरल थोडक्यात बचावले; दोन्ही पायलट जखमी….
कॉकरोच जनता पार्टीवर कारवाई; एक्स, इन्स्टानंतर वेबसाईटवरही बंदी…
पेट्रोल-डिझेलच्या किमतीत पुन्हा वाढ, चेक करा नवे दर…
दहावी पास विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी, बोर्डाने घेतला मोठा निर्णय…
उद्धव ठाकरेंनी फसवलं..? बच्चू कडू यांचा खळबळजनक गौप्यस्फोट…