महागाव नगर पंचायत अध्यक्ष पदाची निवड भाजपाचा होणार अध्यक्ष.? काँग्रेस किंवा शिवसेनेचा होणार उपाध्यक्ष
रितेश पुरोहित ; 9423703831
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
यवतमाळ :- “महागाव नगरपंचायत सत्ता बदलीचे वारे सुरू असतांनाच असलेले अविश्वास प्रस्ताव पारित झाल्यानंतर भाजपाने काँग्रेसच्या काही नगरसेवकांना हाताशी धरून विद्यमान काँग्रेसच्या अध्यक्षांना पदावरून पाय उतार केला हे सर्व खरे असले तरी भाजपा जवळ अध्यक्ष करण्याइतके संख्याबळ नाही परंतु भाजपाच्या रणनीती व उमरखेड च्या “किंगमेकर” यांची राजनीती या महागाव नगरपंचायत अध्यक्ष उपाध्यक्ष निवडीमध्ये महत्त्वाची भूमिका ठरणार आहे खरे तर महागाव नगरपंचायत मध्ये मागील सत्ता स्थापनेनंतर अनेक बाबीवर संघर्ष झाला या संघर्षानंतर देशी दारूची दुकाने तथा विकास कामांवरून नगरसेवकांमध्ये मतभेद निर्माण झाले हेच बाब भाजपाने हेरून सर्व असंतुष्ट नगरसेवकांना हाताशी धरून नगरपंचायत मध्ये अध्यक्ष बदलीसाठी व्ह्यू रचना रचली असे असताना सर्वपक्षीय संख्याबळ बघितले असता आजही भाजपाचा अध्यक्ष होईल असे पक्षाकडे स्वतःच्या पक्षा चे नगरसेवक नसताना यामध्ये उडी घेतली आहे परंतु 27 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या अध्यक्ष निवडीमध्ये भाजपाचा नगराध्यक्ष होईल असे राजकीय धुरंदरांकडून बोलल्या जाते परंतु भाजपासोबत काँग्रेसचे बंडखोर नगरसेवक व शिवसेना यांचे नगरसेवक एका दिलाने सोबत असल्याचे चित्र सध्या तरी दिसत आहे खरे तर महागाव मध्ये नगराध्यक्ष पदासाठी येणाऱ्या काळात थेट निवडणूक होणार आहे यामध्ये भाजपाकडे सक्षम उमेदवार नाही आहे. भाजपाने यामध्ये राजकीय खेळी वापरत यावेळेस भाजपाचा अध्यक्ष झाला पाहिजे ही रणनीती आखली आहे इतकेच नाही तर येत्या महागाव नगरपंचायत निवडणुकीमध्ये भाजपाचाच नगराध्यक्ष कसा पदावर बसविता येईल याबद्दलही व्यूहरचना रचली आहे.
खरे तर महागाव नगरपंचायत मध्ये पक्षीय संख्याबळ बघितले असता भाजपाचे चार , शिवसेना-पाच , काँग्रेस सात , अपक्ष एक असे 17 संख्याबळ आहे असे असताना भाजपाने यामध्ये भाजपाचा नगराध्यक्ष करण्याची रणनीती आखली आहे आणि ते सक्सेस ही होणार यात काही शंका वाटत नाही भाजपाचा अध्यक्ष तर उपाध्यक्ष काँग्रेस किंवा शिवसेना यांच्या मध्ये रसिकेस झाल्यास काँग्रेसचा किंवा शिवसेनेचा एक उपाध्यक्ष व एक बांधकाम सभापती अशी स्थिती निश्चितच होणार भाजपाने आगामी नऊ महिन्यानंतर होणाऱ्या महागाव नगरपंचायतीवर भाजपाचा झेंडा कसा फडकविता येणार यासाठी प्रयत्न सुरू केले आहे परंतु आगामी नगरपंचायत निवडणूक नगराध्यक्ष पद हे थेट जनतेतून निवडून येणार आहे त्याकरिता भाजपाकडे सक्षम उमेदवार नाही भाजपाला काँग्रेस किंवा इतर पक्षातून उमेदवार आयात करून त्याच्या गळ्यात भाजपाचा शेला टाकून नगरपंचायत निवडणूक मध्ये नगराध्यक्ष पदाचे कॅंडिडेट ठरविल्या जाणार असल्याचे चित्र दिसत आहे खरे तर भाजपाचे महागाव तालुका अध्यक्ष दीपक आडे यांना त्यांच्या परिवारात उर्वरित कार्यकाळासाठी नगराध्यक्ष पद मिळण्याची दाट शक्यता आहे कारण यांच्या घरात नगराध्यक्ष पदाचे तिकीट दिले तर महागाव शहरांमध्ये बंजारा समाजाचे मतदान अल्प आहे त्यामुळे काँग्रेस मधून महागाव मध्ये ब्रँडेड उमेदवार घेऊन व त्याचा पक्ष प्रवेश करून भाजपाच्या तिकिटाची आगामी नगरपंचायत निवडणुकीमध्ये अध्यक्षपदाच्या निवडणुकीत कॅंडिडेट म्हणून उतरवतील असे चित्र सध्या तरी दिसत आहे. असे राजकीय धुरंदराकडून बोलल्या जाते की आगामी निवडणुकीमध्ये जीवाचे रान करून भाजपा आपली सत्ता नगरपंचायत मध्ये कशी बसवता येईल यासाठी या अध्यक्ष पदाच्या निवडी पासूनच व्ह्यू रचना रचत आहे असे चित्र सध्या स्थितीस दिसत आहे.

पत्रकारावर खोटे गुन्हे दाखल करणाऱ्या ठाणेदारांवर निलंबनाची कारवाई करा ; महागाव तालुका पत्रकार संघाचा आंदोलनाचा इशारा….
राज्यात गारपिटीचा हाहाकार..! 12 जिल्ह्यांमध्ये संकट, थेट ऑरेंज अलर्ट, पुढील…
“शेतकऱ्यांचा ७/१२ कोरा करा, शेतमालाला हमीभाव द्या”: हर्षवर्धन सपकाळांची मागणी, सरकारवर टीका….
राष्ट्रवादीत काय चालले आहे..? अविश्वासाचे वातावरण आणि नेतृत्वाचा संघर्ष….
संकटाची परिस्थिती हीच संधी ; लोकांच्या प्रश्नावर रस्त्यावर उतरा….
‘५० खोके’ला ५० ‘ठोसे’ने उत्तर; शिंदेसेनेला साथ देत भाजप नेत्यांचा विरोधकांना इशारा….