श्रीरामचंद्रानंतर स्त्रीचा सन्मान करणारा एकमेव राजा म्हणजे ‘शिवराय’ :- ॲड. माधवराव माने….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
हिवरा संगम :- हिवरा गावाच्या वैभवात भर घालणारे व अठरापागड जातीचे दैवत समजले जाणारे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरन व छत्रपती शिवराय चौकाचे लोकार्पण दिनांक 19 फेब्रुवारी 2026 ला शिवजयंतीच्या पावन पर्वावर बस स्थानक परिसरात मोठ्या थाटात संपन्न झाले.
“आजच्या काळात महिलांवरील अत्याचाराच्या घटनांनी देश हादरत असताना, छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांची अंमलबजावणी करणे हीच काळाची गरज आहे. प्रभू श्रीरामचंद्रानंतर परस्त्रीला मातेचा दर्जा देऊन तिचा सन्मान करणारा जगातील एकमेव राजा म्हणजे छत्रपती शिवराय होत,” असे गौरवपूर्ण उद्गार ज्येष्ठ विधिज्ज्ञ ॲड. माधवराव माने पाटील यांनी काढले.
महागाव तालुक्यातील हिवरा (संगम) येथे हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आयोजित भव्य सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी महाराजांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण आणि शिवराय चौक सौंदर्यीकरण कामाचे लोकार्पण मान्यवरांच्या हस्ते उत्साहात पार पडले.
“अन्यायाविरुद्ध शिवरायांसारखी जरब हवी”
कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून बोलताना ॲड. माने पुढे म्हणाले की, “महाराजांनी आपल्या काळात स्त्रीवर वाकडी नजर ठेवणाऱ्यांचे हातपाय तोडून कडक शासन केले होते. आजच्या तरुण पिढीने शिवरायांचे हे विचार अंगीकारल्यास देशात खऱ्या अर्थाने ‘सुराज्य’ निर्माण होईल. सत्तेत बसलेल्यांनीही शिवरायांची ही शिकवण अमलात आणण्याची गरज आहे.”
मान्यवरांची उपस्थिती
या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार नामदेवराव ससाणे होते. प्रमुख अतिथी म्हणून खालील मान्यवर उपस्थित होते:
नितीन भुतडा (भाजपा जिल्हा समन्वयक) , ॲड. रमेश पाटील, ॲड. अनिल माने , साहेबराव पाटील (माजी जि.प. सदस्य) , सौ. स्मिताताई साहेबराव पाटील (संचालिका, जिल्हा बँक) , सौ. मेघाताई शिरीष बोरूळकर (सरपंच)
यासोबतच उपसरपंच शरद पाटील, पोलीस पाटील प्रवीण कदम, माजी सभापती ललिताताई जामकर, शिवसेना तालुका प्रमुख रवींद्र भारती, पत्रकार गजानन वाघमारे, सेवानिवृत्त मुख्याध्यापक मुकुंद पांडे, विजय बोंपिलवार, शफीसेठ सुरैय्या, डॉ.धोंडीराव बोरुळकर , अशोक जयस्वाल , ग्रामपंचायत सदस्य पंजाबराव पाटील, राजू धोतरकर,यांसह अनेक प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक साहेबराव पाटील यांनी केले, तर सूत्रसंचालन राजू गिरी यांनी आणि आभार महेश कामारकर यांनी मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी छत्रपती शिवराय चौक समितीचे अध्यक्ष देवेंद्र कदम, उपाध्यक्ष सुनील चव्हाण, सचिव महेश कामारकर, कोषाध्यक्ष मुकुंद जामकर प्रवीण जामकर, किरण काळे, अनिल मुडेवाड, निलेश करमोडकर शेख फिरोज,रोहीत फाळके, संतोष पिंपळे, सुदर्शन कदम, प्रदीप कदम, विनोद कदम सोनू भैसे यांच्यासह समितीच्या सर्व सदस्यांनी दिवस-रात्र परिश्रम घेतले.
या सोहळ्याला परिसरातील शिवभक्त, गावकरी मंडळी आणि महिलांची उपस्थिती लक्षणीय होती, ज्यामुळे संपूर्ण परिसर ‘जय भवानी, जय शिवाजी’च्या घोषणांनी दुमदुमून गेला होता.

पत्रकारावर खोटे गुन्हे दाखल करणाऱ्या ठाणेदारांवर निलंबनाची कारवाई करा ; महागाव तालुका पत्रकार संघाचा आंदोलनाचा इशारा….
राज्यात गारपिटीचा हाहाकार..! 12 जिल्ह्यांमध्ये संकट, थेट ऑरेंज अलर्ट, पुढील…
“शेतकऱ्यांचा ७/१२ कोरा करा, शेतमालाला हमीभाव द्या”: हर्षवर्धन सपकाळांची मागणी, सरकारवर टीका….
राष्ट्रवादीत काय चालले आहे..? अविश्वासाचे वातावरण आणि नेतृत्वाचा संघर्ष….
संकटाची परिस्थिती हीच संधी ; लोकांच्या प्रश्नावर रस्त्यावर उतरा….
‘५० खोके’ला ५० ‘ठोसे’ने उत्तर; शिंदेसेनेला साथ देत भाजप नेत्यांचा विरोधकांना इशारा….