तेली प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेत रिंगस क्रिकेट क्लब हे ठरली प्रथम विजेता…..

पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
पुसद :- “येथील मुस्लिम तेली समाजाच्या वतीने काकडदाती येथील डीजे टर्फवर क्रिकेट सामन्याचे आयोजन करण्यात आले होते. या आयोजित क्रिकेट सामन्याच्या प्रथम विजेत्याला ७७७७ रुपयांचं बक्षीस हनिफ निरबान यांचे वतीने देण्यात आले तर दुसऱ्या क्रमांकाचे ५५५५ रुपयांचे बक्षीस फिरोज तगाले यांच्या वतीने देण्यात आले.
विजेत्यांची ट्रॉफी हाजी अजीस चव्हाण , तर दुसऱ्या क्रमांकाची ट्रॉफी निजाम जी गौरी यांच्या वतीने तर प्रत्येक मैचेस मध्ये मॅन-ऑफ-द-मैच ची ट्रॉफी रहेमान असलम चव्हाण यांच्या तर्फे देण्यात आली तर मॅन-ऑफ-द-सिरीज चे चार ही ट्रॉफी मुबारक निरबाण यांच्या वतीने देण्यात आली या तीन दिवसीय क्रिकेट सामन्यात ८ टीमचे सामने रंगले होते या मध्ये चुरशी ची लढत करून रिंगस क्रिकेट क्लब व निरबाण क्रिकेट क्लब हे दोन्ही टीम अंतिम सामन्यात पोहचले होते. त्यांच्या मध्ये चांगलीच लढत होऊन रिंगस क्रिकेट क्लब हे विजयी झाली तर निरबाण क्रिकेट क्लब दुसऱ्या क्रमांकाची विजेता ठरली. तर रिंगस टीम चे खेळाळू अनिस निरबाण यांना मॅन-ऑफ-द-मैच व बेस्ट प्लियर ऑफ द मैच यांना देण्यात आले व मॅन-ऑफ-द-बेस्ट फिल्डर शाहरुख निरबाण, मॅन-ऑफ-द-बेस्ट बॉलर मोहसिन निरबाण यांना देण्यात आला होता.
रेफरी म्हणून ताज जिंदरान, फहिम मेमन यांनी कार्य केले. सूत्र संचालन लतीफ गौरी यांनी केले.

हा निरबाण क्रिकेट क्लब दुसऱ्या क्रमांकाचा विजेता ठरला…!
या प्रसंगी हनिफ निरबाण , फिरोज तगाले , हाजी हनिफ चव्हाण, मुबारक निरबाण, हाजी अजीस चव्हाण , युनूस निरबाण ,अनिस चव्हाण, मतीन चव्हाण, जुबेर चव्हाण, सलीम निरबाण, वसीम निरबाण, सरफराज निरबाण , व अन्य मान्यवरांच्या हस्ते खेळाडूना ट्रॉफी देण्यात आली. आयोजन अजहर निरबाण सर, विक्की गौरी, शकील गौरी, जम्मा गौरी , अब्दुल रहेमान चव्हाण, फारूक चव्हाण, लतीफ गौरी, रशीद मामा चव्हाण, सोहेल निरबाण , युसुफ निरबाण, रहेमान गौरी ,इद्रिस रजा, वसीम चव्हाण, सोनू तगाले, सलमान निरबाण , जमशेद चव्हाण व अन्य क्रिकेटप्रेमी यांनी अथक परिश्रम घेतले.

गोवंश तस्करांनी केली बजरंग दल कार्यकर्त्याची दगडांनी ठेचून निर्घृण हत्या ; सुकळी गावात मध्यरात्री घडला काळजाचा थरकाप उडवणारा प्रकार…
लडाखमध्ये लष्कराचे ‘चीता’ हेलिकॉप्टर डोंगराला धडकले, मेजर जनरल थोडक्यात बचावले; दोन्ही पायलट जखमी….
कॉकरोच जनता पार्टीवर कारवाई; एक्स, इन्स्टानंतर वेबसाईटवरही बंदी…
पेट्रोल-डिझेलच्या किमतीत पुन्हा वाढ, चेक करा नवे दर…
दहावी पास विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी, बोर्डाने घेतला मोठा निर्णय…
उद्धव ठाकरेंनी फसवलं..? बच्चू कडू यांचा खळबळजनक गौप्यस्फोट…