समाज बांधवांतर्फे नांदेडच्या महापौर कविता संतोषराव मुळे यांचा सत्कार….

पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
पुसद :- नांदेडच्या नवनियुक्त महापौर कविता संतोषराव मुळे यांचा सत्कार पुसद येथील समाज बांधवांतर्फे करण्यात आला. यापूर्वी येथे आयोजीत मराठा कुणबी समाज उपवर उपवधू मेळाव्याच्या त्या मार्गदर्शक आहेत. नांदेडच्या पहिल्या भाजपा महापौर म्हणून त्यांना शुभेच्छा देण्यासाठी येथील भाजपा गटनेते तथा नगरसेवक दीपक काळे, शंकर गावंडे, विकास खंदारे, हरिभाऊ ठाकरे, ॲड नितीन जाधव, कैलास ठेंगे, पंकज खंदारे, प्रथमेश येणकर, गजानन कनवाळे आदींनी त्यांना भावी कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी कविता मुळे आणि त्यांचे पती तथा भाजपा नेते संतोषराव मुळे यांचा हृदय सत्कार करण्यात आला. पुसद सोबत त्यांचे भावनिक ऋणानुबंध असून येथील शिक्षक चंद्रकांत ठेंगे यांच्या त्या मावस बहीण आहेत. यावेळी कविता मुळे यांनी मनोगत व्यक्त करतांना सामान्य कुटुंबातील उच्चशिक्षित महिलेला भाजपा पक्षाने संधी दिल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. सामान्य जनतेच्या समस्या सोडविणे आणि नांदेडच्या सर्वांगीण विकासाला अग्रक्रम असेल असे त्यांनी स्पष्ट केले.
मागील काळात येथील मराठा कुणबी समाज मेळाव्याला त्या प्रामुख्याने उपस्थित राहत असत. त्यामुळे येथील समाज बांधवांनी भेट घेऊन शुभेच्छा दिल्या.

गोवंश तस्करांनी केली बजरंग दल कार्यकर्त्याची दगडांनी ठेचून निर्घृण हत्या ; सुकळी गावात मध्यरात्री घडला काळजाचा थरकाप उडवणारा प्रकार…
लडाखमध्ये लष्कराचे ‘चीता’ हेलिकॉप्टर डोंगराला धडकले, मेजर जनरल थोडक्यात बचावले; दोन्ही पायलट जखमी….
कॉकरोच जनता पार्टीवर कारवाई; एक्स, इन्स्टानंतर वेबसाईटवरही बंदी…
पेट्रोल-डिझेलच्या किमतीत पुन्हा वाढ, चेक करा नवे दर…
दहावी पास विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी, बोर्डाने घेतला मोठा निर्णय…
उद्धव ठाकरेंनी फसवलं..? बच्चू कडू यांचा खळबळजनक गौप्यस्फोट…