संजय राऊत यांची दिलगिरी; दादा भुसे यांनी बदनामीचा खटला घेतला मागे..!

पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मालेगाव :- “गेल्या अनेक दिवसांपासून राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरलेल्या १७८ कोटींच्या शेअर्स घोटाळ्याच्या आरोपाप्रकरणी आज नाट्यमय घडामोडी पाहायला मिळाल्या. शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत आज मालेगाव न्यायालयात हजर झाले.
त्यांनी दिलगिरी व्यक्त केल्यानंतर शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी बदनामीचा खटला मागे घेतला आहे.
संजय राऊत यांनी ‘सामना’तून मंत्री दादा भुसे यांच्यावर गिरणा साखर कारखान्याच्या व्यवहारात १७८ कोटींचा अपहार केल्याचा खळबळजनक आरोप केला होता. मात्र, आज न्यायालयात हजर राहण्यापूर्वी राऊत यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. अद्वय हिरे यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे आपण हे आरोप केले होते. परंतु, वस्तुस्थिती पाहता आपण ते आरोप मागे घेत आहोत,असे राऊत यांनी जाहीर केले. राजकारणात अनेकदा माहितीच्या आधारे आरोप केले जातात. दादा भुसे यांच्याबद्दलची माहिती अद्वय हिरे यांनी दिली होती. त्या माहितीनुसार मी भूमिका मांडली होती, पण आता मी ते सर्व आरोप मागे घेत असून त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करत असल्याचे राऊत यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
यापूर्वीच्या सुनावणीला गैरहजर राहिल्यामुळे न्यायालयाने राऊत यांना एक हजार रुपयांचा दंड ठोठावला होता. आजच्या सुनावणीवेळी राऊत स्वतः न्यायालयात हजर राहिले. सदरहू माहिती शिवसेना शिंदे गटाचे तत्कालीन उपनेते अद्वय हिरे यांनी दिली होती. या माहितीमध्ये कोणतीही सत्यता नसल्याचे नुकतेच माहित झाले. त्यामुळे सदरहू बदनामीकारक बातमीमुळे फिर्यादी तसेच गिरणा कारखान्याचे शेतकरी, सभासद यांच्या भावना दुखविल्या गेल्या,असे म्हणत संजय राऊत यांनी यांनी न्यायालयात दिलगिरी व्यक्त केली. तसेच राऊत यांनी गिरणा कारखान्याचे सभासद आणि शेतकरी यांची सत्यबाजू सामना वृत्तपत्रात प्रसिध्द करण्याचे न्यायालयात मान्य केले. त्यानंतर भुसे यांनी बदनामीचा खटला मागे घेतला. तत्पूर्वी येथील शासकीय विश्रामगृहात शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख संजय दुसाने, सुनील देवरे आदी नेते व राऊत यांच्यात चर्चा झाली. त्यानंतर भुसे व राऊत हे न्यायालयात सोबतच गेले.
प्रकरण काय आहे ?
अवसायनात निघालेल्या दाभाडी येथील गिरणा सहकारी साखर कारखान्याची पंधरा वर्षांपूर्वी विक्री करण्यात आली आहे. मंत्री छगन भुजबळ यांच्याशी संबंधित कंपनीने २७ कोटी १५ लाखाला हा कारखाना खरेदी केला आहे. हा विक्री व्यवहार होत असताना भुसे यांनी मालेगाव व आसपासच्या तालुक्यातील लोकांकडून काही भाग भांडवल जमा केले होते. कारखाना खरेदी करण्याच्या नावाने हे भाग भांडवल जमा करण्यात आले. परंतु प्रत्यक्षात या भाग भांडवलातून कारखाना खरेदी न करता ते पैसे हडप केले, असा आरोप राऊत यांनी बातमीच्या माध्यमातून भुसे यांच्यावर केला होता. लोकांकडून जमविलेले जवळपास १७८ कोटी रुपये भुसे यांनी हडप केले, असा दावा राऊत यांनी केला होता.

गोवंश तस्करांनी केली बजरंग दल कार्यकर्त्याची दगडांनी ठेचून निर्घृण हत्या ; सुकळी गावात मध्यरात्री घडला काळजाचा थरकाप उडवणारा प्रकार…
लडाखमध्ये लष्कराचे ‘चीता’ हेलिकॉप्टर डोंगराला धडकले, मेजर जनरल थोडक्यात बचावले; दोन्ही पायलट जखमी….
कॉकरोच जनता पार्टीवर कारवाई; एक्स, इन्स्टानंतर वेबसाईटवरही बंदी…
पेट्रोल-डिझेलच्या किमतीत पुन्हा वाढ, चेक करा नवे दर…
दहावी पास विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी, बोर्डाने घेतला मोठा निर्णय…
उद्धव ठाकरेंनी फसवलं..? बच्चू कडू यांचा खळबळजनक गौप्यस्फोट…