मुख्यमंत्री फडणवीसांच्या नाराजीच्या वक्तव्यावर अजित पवारांची प्रतिक्रिया; ‘मग चुका सांगायच्या नाही का?’
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- “महापालिका निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. ऐन महापालिका निवडणुका सुरू असताना एका मुलाखतीत बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांच्यावर नाराजी व्यक्त केली.
‘अजित पवारांनी युती धर्म पाळला नाही’, असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी खंत व्यक्त केली. त्यामुळे महायुतीत चर्चांना उधाण आलं. दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्यानंतर आता अजित पवार यांनी प्रतिक्रिया देत युती धर्माबाबत भाष्य केलं. ‘चुका सांगणं म्हणजे युती धर्म न पाळणं होतं का?’, अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी माध्यमांशी बोलताना दिली.
अजित पवार काय म्हणाले?
अजित पवारांनी युती धर्म पाळला नसल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी बोलून दाखवलं. त्यांच्या या वक्तव्याबाबत पत्रकारांनी अजित पवारांना प्रश्न विचारला. त्यावर बोलताना अजित पवार म्हणाले की, “मी कुठे टीका केली. जर मी या ठिकाणी महापालिका निवडणूक लढवतोय, तर मग ९ वर्षांत येथे काय चुका झाल्या ते सांगायचं नाही का? चुका सांगणं म्हणजे युती धर्म न पाळणं होतं का? मी चुका पुराव्यानीशी दाखवतोय. पहिल्या पत्रकार परिषदेत देखील मी सांगितलं, त्यानंतर सांगितलं आणि आजही तेच सांगतोय”, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं होतं की काहींना ९ वर्षांनी कंठ फुटला. फडणवीसांच्या या वक्तव्याबाबत पत्रकारांनी अजित पवार यांना प्रश्न विचारला. त्यावर बोलताना अजित पवार म्हणाले की, “९ वर्षांनी निवडणूक जाहीर झाली, मधे निवडणूकच जाहीर झाली नव्हती, तर मग कंठ कसा फुटणार?.”
“अजित पवारांनी युती धर्म पाळला नाही…”; फडणवीसांनी काय म्हटलं होतं?
पिंपरी चिंचवडमध्ये बोलताना अजित पवारांनी भाजपावर टीका केली होती. त्यानंतर भाजपाच्या नेत्यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं होतं. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी एका मुलाखतीत बोलताना अजित पवारांच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली.
फडणवीस म्हणाले की, “मी युतीचा धर्म पाळला, पण अजित पवारांनी युती धर्म पाळला नाही. अजित पवारांनी जी वक्तव्यं केली ती वक्तव्यं मला पटलेली नाहीत. पण मी त्याचा प्रतिवाद केलेला नाही. या निवडणुकीत मी पहिल्या दिवशी पासून ठरवलं होतं की मित्र पक्षांवर टीका करणार नाही. ती मी केली नाही. दुसरं ठरवलं होतं की मी कुठल्याही नेत्यावर टीका करणार नाही. मुंबईत उत्तरं मी देतो. विकासावर बोललं नाही तर लोकांना हे वाटू शकतं की आम्ही दुर्बल आहोत. पुणे- पिंपरीत मी युतीचा धर्म पाळला. अजित पवारांनी युती धर्म नाही पाळला.” असं म्हणत देवेंद्र फडणवीसानी नाराजी व्यक्त केली.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..