वंदे मातरमला विरोध करणाऱ्यांना पराभूत करा..! उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आवाहन…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- “वंदे मातरमचा अवमान करणाऱ्या ओवेसी यांच्या पक्षास पराभूत करा. कॉग्रेस आणि ‘ स्थगिती सरकारने ‘ छत्रपती संभाजीनगरचा विकास थांबवला. मुंबई नंतर त्यांनी या शहरात भ्रष्टाचाराची पेरणी केली.
घरात बसून योजनेचे काम पूर्ण करता येत नाही. मुंबईत बसून येथील कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडून दिले आहे. त्यांना घरी बसवा, असे आवाहन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. शहरातील टिव्हीसेंटर भागातील क्रीडा मैदानावर आयोजित शिवसेना उमेदवारांच्या प्रचार सभेत ते बोलत होते.
छत्रपती संभाजीनगर हे नामांतर झाल्या पासूनची ही पहिली निवडणूक आहे. त्यामुळे भगव्याचा महापौर झाला पाहिजे. काही दिवसापूर्वी पर्यंत शिवसेना फक्त ठाण्यापुरती असल्याचे सांगण्यात येत होते. मात्र, विधानसभेत ८० जागा लढवून ६० जागा निवडून आणल्या. चांद्यापासून बांद्यापर्यंत शिवसेना पसरली आहे. नगरपालिका निवडणुकीमध्ये ७० नगराध्यक्ष आणि १४०० नगरसेवक निवडून आले आहेत. आता सांगा खरी शिवसेना कोणाची असा सवाल एकनाथ शिंदे यांनी केला.
पतंग कट गई
शिवसेना उद्धव ठाकरे गटाने कोणाला उमेदवारी दिली, तर रशीद मामूला. मग त्यांना तुम्ही मतदान करणार का, हिंदुत्वाची साथ देणाऱ्यांसाठी ही धोक्याची घंटा त्यामुळे त्यांच्या मतात घट होत आहे. याच वेळी सभेच्या ठिकाणी दोन वेळा कटलेली पतंग लोकांना दिसली. ही कोणाची निशाणी आहे का, असे शिंदे यांनी विचारले. त्यावर ‘ जलील’ असे उत्तर आले. त्याला तर ‘ जलील’ करू असे म्हणत शिंदे यांनी पंतग कट गई असे म्हणत ‘ एमआयएम’ची खिल्ली उडवली.
कानात सांगितले निधीचे आकडे
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे भाषण सुरू असताना काही मिनिटाने पालकमंत्री संजय शिरसाट यांनी पिपल्स एज्युकेशन सोसायटीला दिल्याची आठवण करुन दिली. मग खासदार संदीपान भुमरे यांनी उद्योगातील गुंतवणुकीचे श्रेय घेण्याचे सुचवले. मग शिंदे यांनी एक लाख कोटीची गुंतवणूक झाल्याचे सांगितले. पुढे प्रदीप जैस्वाल यांनी चिखल असलेल्या रस्त्यांसाठी ५० कोटी रुपये दिल्याची आठवण करुन दिली. तो आकडाही शिंदे यांनी पुढे लोकांसमोर मांडला. नेता यायाचा आणि आकडा सांगायचा असे चित्र संपूर्ण सभेत दिसून आले. एकदा तर मी दिलेल्या निधीचे कामे सुरू आहेत ना, अशी खात्रीही शिंदे यांनी पालकमंत्र्यांना विचारुन करून घेतली.
दोन महिन्यात पाणी येणार असे आश्वासन शिंदेही यांनीही दिले. मी एकदा शब्द दिला की मी माझेही ऐकत नाही. तो शब्द पूर्ण करतोच असेही शिंदे म्हणाले. यावेळी पालकमंत्री संजय शिरसाट, जिल्हा प्रमुख राजेंद्र जंजाळ, आमदार प्रदीप जैस्वाल, खासदार संदीपान भुमरे यांची उपस्थिती होती.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..