शिंदेसेनेच्या बड्या नेत्याची तब्येत बिघडली,तत्काळ रुग्णालयात दाखल….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
अमरावती :- “राज्यातील 29 महापालिका निवडणुकीच्या घोषणा झाल्यापासून प्रत्येक पक्ष आणि त्याचा पदाधिकारी आणि नेतेमंडळी कामाला लागले आहेत. बैठकांवर बैठका लावल्या जातायत,चर्चेच्या अनेक फेऱ्या वाटाघाटी असं काहीस वातावरण प्रत्येक जिल्ह्यात आहेत.
अशात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या बड्या नेत्याची तब्येत बिघडल्याची माहिती समोर आली आहे.त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
महापालिका निवडणुकीच्या वाटाघाटी दरम्यान शिवसेनेचे नेते आनंदराव अडसूळ यांची अचानक बिघडली प्रकृती होती.त्यामुळे अमरावतीच्या खाजगी रुग्णालयात आनंदराव अडसूळ यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. विशेष म्हणजे अडसूळ यांची भेट घेण्यासाठी भाजपचे आमदार संजय कुटे रुग्णालयात दाखल झाले होते. यावेळी आमदार संजय कुटे आणि माजी आमदार अभिजीत अडसूळ यांची चर्चा सुरू आहे. निवडणुकीच्या अनुषंगाने पुन्हा एकदा जागा वाटपाची चर्चा सुरू झाल्याची माहिती आहे. तसेच पुढे आणखी काय वाटाघाटी होते याकडे लागले सर्वांचे लक्ष लागले आहे.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..