शिवसेना शिंदे गटाचे स्टार प्रचारक जाहीर; अभिनेता गोविंदा, शायना, निरुपम यादीत…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- “मुंबईसह राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणुकीसाठी शिवसेना शिंदे गटाने बुधवारी आपल्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली. या यादीत पक्षाचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह ज्येष्ठ नेते रामदास कदम, गजानन कीर्तिकर, आनंदराव अडसूळ यांच्यासह अभिनेता गोविंदा यांचा समावेश आहे.
स्टार प्रचारकांच्या यादीत शिंदे गटाचे मंत्री आणि बहुतांश खासदार यांचा समावेश आहे.
शिंदे गटाचे संसदीय गटनेते डॉ. श्रीकांत शिंदे, केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्यासह मंत्री उदय सामंत, गुलाबराव पाटील, दादा भुसे, संजय शिरसाट, संजय राठोड, भरतशेठ गोगावले, प्रकाश आबिटकर, प्रताप सरनाईक, आशिष जयस्वाल, योगेश कदम, माजी मंत्री दीपक केसरकर, खासदार श्रीरंग बारणे, धैर्यशील माने, संदीपान भुमरे, नरेश म्हस्के, रवींद्र वायकर, मिलिंद देवरा, राहुल शेवाळे , माजी मंत्री दीपक सावंत, शहाजीबापू पाटील, मनीषा कायंदे नीलेश राणे यांचा स्टार प्रचारकांच्या यादीत समावेश आहे.
याशिवाय संजय निरुपम , राजू वाघमारे, ज्योती वाघमारे, पूर्वेश सरनाईक, राहुल लोंढे, अक्षय महाराज भोसले, समीर काझी, शायना एन. सी. यांनाही स्टार प्रचारकांच्या यादीत स्थान मिळाले आहे.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..