भाजपची १०० उमेदवारांची पहिली यादी तयार..! कुणाला संधी अन् कुणाला डच्चू….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- “महापालिकेच्या निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाची पहिली यादी तयार झाली आहे. यामध्ये १०० पेक्षा अधिक नावांवर एकमत झाले. तर ४० ते ५० नावांवर कोअर कमिटीच्या बैठकीत एकमत झाले नाही.
त्यामुळे ही नावे प्रदेश पातळीवरील नेत्यांकडे देऊन त्यावर निर्णय घेतला जाणार आहे. दरम्यान, भाजपच्या कोअर कमिटीने मान्यता दिलेल्या उमेदवारांची पहिली यादी आज गुरुवारी (२५ डिसेंबरला) प्रदेश कार्यालयाकडे दिली जाणार असून शुक्रवारी (२६ डिसेंबरला) ही यादी जाहीर केली जाणार आहेत.
महापालिकेची निवडणूक भाजप, शिवसेना (शिंदे) पक्षाने युतीच्या माध्यमातून लढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार शिवसेना (शिंदे) पक्षातील स्थानिक पदाधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आली आहे. यामध्ये शहरातील ३४ जागा शिवसेना (शिंदे) पक्षाला द्याव्यात, अशी मागणी करण्यात आली. मात्र इतक्या जागा दिल्या जाणार नसल्याचे भाजपच्या नेत्यांनी स्पष्ट केल्याने जागावाटपाचा तिढा अद्यापही सुटलेला नाही. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला पुणे महापालिकेत केवळ १६ जागा देण्याची तयारी भाजपने दाखविली आहे. त्यामुळे शिवसेना पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे. जागा वाटपावर तोडगा निघत नसल्याने याचा निर्णय दोन्ही पक्षाचे वरिष्ठ नेते घेतील असा तोडगा काढण्यात आला.
महापालिकेत एकहाती सत्ता कशी मिळेल, यासाठीचे नियोजन भारतीय जनता पक्षाने सुरु केले आहे. महापालिकेसाठी उमेदवारी कोणाला द्यायची याबाबत निर्णय घेण्यासाठी बुधवारी पक्षाच्या कोअर कमिटीची बैठक आपटे रस्त्यावरील एका हॉटेलमध्ये झाली. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, पक्षाचे पुणे शहर अध्यक्ष धीरज घाटे, महापालिका निवडणूक प्रमुख गणेश बीडकर, राजेश पांडे, माजी सभागृह नेते श्रीनाथ भिमाले यांच्या उपस्थितीत ही बैठक झाली.
बुधवारी सकाळपासून झालेल्या या बैठकीमध्ये विधानसभानिहाय प्रभागांबाबत चर्चा करण्यात आली. संबधित विधानसभा मतदारसंघातील आमदार तसेच तेथील पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी यांच्याशी चर्चा करत कोअर कमिटीने प्रभागनिहाय निश्चित केलेल्या उमेदवारांची नावे या बैठकीत सांगण्यात आली. ज्या नावांवर एकमत झाले. त्या नावांवर शिक्कामोर्तब करुन यादी तयार करण्यात आली. प्रभागातील ज्या नावांवर एकमत झालेले नाही, त्यावर निर्णय घेऊन यादी निश्चित करण्याची जबाबदारी प्रदेश पातळीवरील नेत्यांकडे देण्याचा निर्णय घेण्यात आला, अशी माहिती भाजपमधील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी दिली.
कोअर कमिटीच्या बैठकीत शंभर उमेदवारांची नावे निश्चित करण्यात आली आहे. ४० ते ५० उमेदवारांच्या नावांवर कमिटीच्या सदस्यांचे एकमत झाले नाही. विधानसभा निहाय प्रभागातील उमेदवारांची नावे संबधित विधानसभेचे आमदार तसेच तेथील वरिष्ठ पदाधिकारी यांच्याशी चर्चा करुन निश्चित करण्यात आली आहेत. ही यादी शुक्रवारी २६ डिसेंबरला जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यानंतर उर्वरित उमेदवारांच्या नावावर चर्चा करुन दुसऱ्या टप्प्याची यादी जाहिर केली जाईल, असेही या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
शिवसेना (ठाकरे) पक्षाला ३४ जागांची अपेक्षा
महापालिका निवडणूक भाजप शिवसेना (शिंदे) पक्षाने युतीच्या माध्यमातून लढविण्याचा निर्णय घेतला आहे. निवडणुकीत ३४ जागा मिळाव्यात, अशी मागणी शिवसेनेने केली आहे. मात्र केवळ १६ जागा देण्याची तयारी भाजपने दाखविल्याने शिवसेना (शिंदे) पक्षाचे पदाधिकारी नाराज झाले आहेत. भाजप अशा पद्धतीने जागा वाटप करणार असेल तर महायुतीचा फायदा काय? असा प्रश्नही शिवसेना (शिंदे) पक्षाकडून विचारला जात आहे.

सुप्रिया सुळे प्रशांत जगतापांच्या नाराजीवर स्पष्टच बोलल्या; म्हणाल्या, ‘समाजात काम करताना नाराजी…’
गड्डमवार यांनी घडलेली विकास व कृषी क्रांती आजही प्रेरणादायी; आ. विजय वडेट्टीवार यांचे प्रतिपादन….
मंत्री नितेश राणेंसह दोन आमदारांविरुद्ध अटक वॉरंट जारी; न्यायालयाचा नेतेमंडळींना दणका….
एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा, दुसरीकडे फडणवीस सरकारचे चार महत्त्वाचे निर्णय समोर…..
काँग्रेसचा बुलंद आवाज हरपला ; महाराष्ट्राच्या माजी वनमंत्र्यांचे उपचारादरम्यान निधन….
जागावाटप ते महापौरपद, ठाकरे बंधूंनी सर्वच सांगितलं, मनसे-ठाकरेंकडून अधिकृत युतीची घोषणा….