जिल्ह्यात पहिल्यांदा कलम ३९७ गुन्हा दाखल : ढाणकी परिसरातील शस्त्र दरोड्यातील दहा आरोपी गजाआड ; चार दिवसात गुन्हा उघडकीस
स्थानिक गुन्हे शाखेच्या उत्तम कामगिरीचे अधीक्षकांनी केले कौतुक
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
स्वप्नील चिकाटे : ९९७०५३५९८८
ढाणकी :
ढाणकी शहरालगत खरुस रोडवर सायंकाळी सशस्त्र दरोडा टाकून तेथील गड्याला मारहाण केल्याप्रकरणी बिटरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केल्यानंतर अवघ्या चार दिवसाच्या आत स्थानिक शाखेच्या पथकाला छडा लावण्यात यश आले आहे. त्यामुळे स्थानिक गुन्हे शाखेच्या चमुंचे पोलीस अधीक्षक यवतमाळ एम राज कुमार यांनी पत्रकार परिषदेत कौतुक केले आहे.
गुन्हेगाराच्या या मोठ्या संख्येने येऊन दरोडा टाकण्याच्या व मारहाण करण्याच्या प्रकारामुळे ढाणकी परिसरातील नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन यवतमाळ जिल्हा पोलीस अधीक्षक एम राजकुमार यांनी सदरचा गुन्हा तात्काळ उघडकीस आणून आरोपींना अटक करण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रदीप शिरस्कर यांना दिले होते. बिटरगाव पोलीस ठाणेदार विजय चव्हाण व पो निरीक्षक संदीप चव्हाण यांना खबरी च्या माहितीनुसार एक टिप मिळाली .त्यानुसार बिटरगाव तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक शेळके पोलीस उपनिरीक्षक रामकिसन जायेभाये यांचे पथक शासकीय वाहनाने हिमायतनगर येथे हे रवाना होऊन मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे हिमायतनगर येथे सापळा रचून आरोपी विश्वनाथ शंकर शिंदे (२२) रा. उमरी, शुभम मुकुंदराव अडकिने (३१) रा .पवार कॉलनी भोकर, विकास किसन परिमल (३९) रा. ढाणकी, राम रामचंद्र लक्ष्मण संजेवाड (१८) रा.भोकर, सुरज गौतम सावते (२१( रा.पावना, चंद्रकांत गौतम सावते (२८) , धम्मदीप नारायण राऊत (२१) रा.पाहुणा ,अजय शेकू राऊत (२०) रा. पावना , नितीन उर्फ एक्का नारायण अडुलवार (२०) रा.उमरी यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेले वाहन महिंद्रा टि यु वि कार व 3 मोटरसायकल चार चाकू एक तलवार, मोबाईल व चोरी गेलेला मुद्देमाल पाच ग्राम सोन्याचे दागिने असा एकूण दहा लाख 23 हजार रुपये मुद्देमाल जप्त केला आहे
सदर गुन्ह्याची कामगिरी पोलीस अधीक्षक, यांच्यासह पोलीस निरीक्षक प्रदीप शिरस्कर पोलीस निरीक्षक सतीश चव्हाण ,पोलीस उपनिरीक्षक निलेश शेळके , पोलीस ठाणेदार विजय चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक जायेभाये रवी गीते संदीप चव्हाण भालेराव तपास केला. अरोपी गजाआड केले यांनी सदर गुन्ह्यातील कलम 397 वाढविण्यात आली आहे सर्व कर्मचाऱ्यांचे कौतुक करण्याकरिता पोलीस अधीक्षक यांनी पत्रकार परिषद घेऊन या बिटरगाव पोलीस ठाणे येथील सर्व पोलीस कर्मचार्यांचे कौतुक केली
तपासात ढाणकी येथील स्थानिक आरोपी विकास परिमल याने मागील दोन महिन्यापूर्वी आरोपी नामे चंद्रकांत गौतम सावती यास ढाणकी ते खरंच रोडवर असलेल्या संजय जिल्हा वाऱ्यांच्या शेतातील गोठ्यात तीन पिढ्या सोने ठेवले असल्याची टीप दिली होती त्यावरून आरोपी चंद्रकांत चौथी मागील दोन महिन्यापासून संजय जिल्हावार यांच्या गोट्यावर पाळत ठेवून भोकर तालुक्यातून आरोपीने साथीदारांची जुळवाजुळव केली असल्याचे व तीन पिढ्या सोने मिळेल या लालची तुन दिनांक 29 ऑगस्ट रोजी सशस्त्र दरोडा टाकला असल्याचे तपासात निष्पन्न झाले.त्यामुळे त्यांच्यावर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.त्यात कलम ३९७ चा समावेश असून ही कलम जिल्ह्यात पहिल्यांदा या घटनेत दाखल करण्यात आली असल्याची माहिती
पोलीस अधीक्षक एम राजकुमार यवतमाळ यांनी यावेळी दिली आहे.
बिटरगाव पोलीस स्टेशन अंतर्गत पोलीस संख्याबळ कमी आहे.त्यामुळे बिटरगाव पोलीस स्टेशन मध्ये पोलीस कर्मचारी यांची संख्या वाढविण्यात यावी अशी मागणी नगराध्यक्ष सुरेश जयस्वाल यांनी पोलिस अधीक्षक एम.राजकुमार यांच्याकडे केली आहे.