विसर्जना दरम्यान विघ्न… मन नदीत बुडून सख्ख्या भावांचा मृत्यू
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
बुलडाणा :
गणपती विसर्जनासाठी गेलेले दोन सख्खे भाऊ शेगाव तालुक्यातील नागझरी जवळील मन नदीच्या पाण्यात बुडाल्याची घटना मंगळवारी सायंकाळी घडलेल्या या अपघातात दोघांचाही मृत्यू झालाय.
शेगाव तालुक्यातील कोला येथील अनंत नगर परिसरात दोघे वास्तव्यास होते. कल्पेश संजय आमले(वय – 26) व रुपेश संजय आमले (वय – 25) अशी मृतांची नावे आहेत.
कल्पेश आणि रुपेश हे दोन्ही भाऊ घरच्या गणपतीचे विसर्जन करण्यासाठी मन नदीवर गेले होते. यावेळी खोलीचा अंदाज न आल्याने ते नदीत बुडाले. नदीवर असलेल्या अन्य गणेश भक्तांच्या लक्षात येताच त्यांनी तिकडे धाव घेतली. प्रथम रुपेशला नदी पात्रातून उपस्थितांनी बाहेर काढले. श्वासोश्वास चालू व्हावा, यासाठी पंपिंग करून पाहिले. मात्र शरीराने प्रतिसाद न दिल्याने त्याचा मृत्यू झाला.
त्यानंतर कल्पेशची शोधाशोध सुरू झाली. सायंकाळी 6 वाजेदरम्यान कल्पेशचा मृतदेह नदीतून बाहेर काढण्यात यश मिळाले. मात्र त्याचाही मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले.
संबंधित घटनेची माहिती मिळताच बाळापूर तसेच शेगाव शहर पोलीस स्टेशनचे अधिकारी पोहोचले असून दोघांचेही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. गणेश

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..