बीडमध्ये पुन्हा मुंडे विरुद्ध मुंडे लढत? महायुतीला तडा जाणार…? पडद्यामागच्या घडामोडींनी सस्पेन्स वाढवला….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
बीड :- “आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक पक्षांमध्ये प्रचंड घडामोडी सुरु आहेत. प्रत्येक पक्ष तयारी लागला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सर्वाधिक जागा जिंकून आपली सत्ता मिळावी यासाठी प्रत्येक पक्षाचे प्रयत्न सुरु आहेत.
याच पक्षाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक पक्षाच्या गोटात हालचाली सुरु आहे. सत्ताधारी पक्षांमध्ये तर दररोज पक्षप्रवेशाचे कार्यक्रम पार पडत आहेत. आगामी निवडणुकांसाठी आपली संघटनात्मक ताकद वाढावी यासाठी प्रत्येक पक्ष प्रयत्न करत आहेत. याच दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटातून एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत बीडमध्ये स्थानिक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते हे स्वतंत्र निवडणूक लढवण्यावर ठाम असल्याची माहिती आहे. त्यामुळे बीडमध्ये सत्ताधारी भाजप विरुद्ध सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस असा संघर्ष बघायला मिळणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
विशेष म्हणजे बीडमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्यात राजकीय वैर होतं. दोन्ही बहीण-भाऊ असले तरी एकमेकांच्या विरोधात त्यांनी निवडणुका लढल्या आहेत. पण राष्ट्रवादी आणि भाजपची युती झाल्यापासून दोन्ही बहीण-भावांमधील दुरावा कमी झाला होता. पण आता राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या भूमिका पाहता बीड जिल्ह्यात पुन्हा एकदा मुंडे विरुद्ध मुंडे असा सामना होण्याची शक्यता आहे. स्थानिक कार्यकर्त्यांची स्वतंत्र निवडणूक लढण्याची भावना आहे. पण युतीबाबत अखेर वरिष्ठ नेतेच निर्णय घेणार आहेत. त्यामुळे याबाबत अंतिम असा कोणहाती निर्णय अद्याप झालेला नाही हे देखील सत्य आहे.
मुंबईत महत्त्वाची बैठक
राष्ट्रवादी काँग्रेसच्या वेगवेगळ्या जिल्ह्यांची आज सकाळपासून मुंबईच्या वरळी डोम येथे बैठक सुरु आहे. नुकतीच बीडची बैठक पार पडली. या बैठकीत कार्यकर्त्यांकडून स्वबळावर निवडणूक लढावी, अशी भूमिका मांडण्यात आली. कारण गेल्या अनेक वर्षांपासून बीडमध्ये भाजप विरुद्ध राष्ट्रवादी अशी लढत होत आली आहे. पण आता युती झाली तर कसं करायचं? याबाबत विचार विनिमय झाला, अशी माहिती ‘एबीपी माझा’ने सूत्रांच्या हवाल्याने दिली आहे. त्यामुळे आगामी निवडणुकांबाबत राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपचे वरिष्ठ नेते काय निर्णय घेतात? ते पाहणं महत्त्वाचं आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याआधीच महायुती शक्यतो सर्वच ठिकाणी एकत्र निवडणूक लढवणार असल्याचं म्हटलं आहे. काही अपवाद सोडले तर महायुतीचे तीनही घटक पक्ष एकत्र निवडणूक लढवतील, यावर देवेंद्र फडणवीस ठाम आहेत. यानंतर आता शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस काय निर्णय घेतं? ते पाहणं महत्त्वाचं आहे.

सुप्रिया सुळे प्रशांत जगतापांच्या नाराजीवर स्पष्टच बोलल्या; म्हणाल्या, ‘समाजात काम करताना नाराजी…’
गड्डमवार यांनी घडलेली विकास व कृषी क्रांती आजही प्रेरणादायी; आ. विजय वडेट्टीवार यांचे प्रतिपादन….
मंत्री नितेश राणेंसह दोन आमदारांविरुद्ध अटक वॉरंट जारी; न्यायालयाचा नेतेमंडळींना दणका….
एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा, दुसरीकडे फडणवीस सरकारचे चार महत्त्वाचे निर्णय समोर…..
काँग्रेसचा बुलंद आवाज हरपला ; महाराष्ट्राच्या माजी वनमंत्र्यांचे उपचारादरम्यान निधन….
जागावाटप ते महापौरपद, ठाकरे बंधूंनी सर्वच सांगितलं, मनसे-ठाकरेंकडून अधिकृत युतीची घोषणा….