हिवाळी अधिवेशन नागपुरातच होणार…?
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नागपूर :- “स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांमुळे हिवाळी अधिवेशन मुंबईत होण्याच्या चर्चांना महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पुर्णविराम लावला आहे. कंत्राटदारांनी कामे सुरू ठेवावीत.
त्यांचे पैसे लवकरच दिले जाईल. नागपुरातच हिवाळी अधिवेशन होणार असून त्यासाठी सर्व तयारी सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. नागपुरात ते सोमवारी प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
यावेळी बावनकुळे यांनी महाविकासआघाडीवर टीकास्त्र सोडले. उद्धव ठाकरे यांचा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर ते केवळ कारणे शोधत आहेत. त्यांच्या खासदारांनी सुद्धा चुकीच्या मतदार यादीवरून निवडणूक जिंकली, ते मतचोरी करून जिंकले. आता मात्र भाजपवर टीका करत आहेत. अशीच जर मानसिकता त्यांनी कायम ठेवली, तर पुढील २५ वर्ष महाविकास आघाडी पुन्हा सत्तेत येऊ शकणार नाही असे बावनकुळे म्हणाले.
मतदार यादीतील अनियमिततेबाबत राज्याचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलारांचे म्हणो पूर्णपणे बरोबर आहे. राहुल गांधीचे, कॉंग्रेसचे लांगुलचालन करणारे खरे महाराष्ट्राचे पप्पू कोण हे सर्वाना माहित आहे. कामठी, मालेगाव आणि सिल्लोड या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दुबार आणि तिबार मतदार आहेत, काही ठिकाणी चार-चार, पाच-पाच नावे एका कुटुंबात आहेत, असा दावा बावनकुळे यांनी केला. कामठीत सुमारे आठ हजार, सिल्लोडमध्ये ८९०, आणि मालेगावात सुमारे १३० मतदारांची नावे दुबार आहेत. या संदर्भात आम्ही यापूर्वीच निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे, असे त्यांनी सांगितले.
नरखेड येथील व्हायरल ऑडिओ संदर्भात चौकशी २४ तासांत होईल. यामध्ये जर कोणी दोषी आढळला तर कठोर कारवाई केली जाईल. पीक विम्यासाठी २ ते ५ रुपयांचे चेक दिल्याच्या माहितीची चाचपणी होत आहे. जुने चेक दाखवून भ्रामक माहिती देण्यात आली का, हेही तपासले जात असल्याचे त्यांनी सांगितले.
मंत्र्यांसाठी दोन नवे टॉवर उभारण्याचा विचार
नागपुरातील अनेक सरकारी बंगले जुने झाले आहेत. त्यामुळे वारंवार दुरुस्तीसाठी उधळपट्टी होते. नागपुरात मंत्री व अधिकाऱ्यांसाठी दोन नवीन टॉवर उभारण्याचा विचार आहे. हेरिटेज नसलेल्या जागी हाय-राईज टॉवर उभारण्याची योजना आहे. रवी भवन नागपूरबाबत लवकरच मुख्यमंत्र्यांकडे प्रेझेंटेशन सादर करू, असे बावनकुळे यांनी सांगितले.

सुप्रिया सुळे प्रशांत जगतापांच्या नाराजीवर स्पष्टच बोलल्या; म्हणाल्या, ‘समाजात काम करताना नाराजी…’
गड्डमवार यांनी घडलेली विकास व कृषी क्रांती आजही प्रेरणादायी; आ. विजय वडेट्टीवार यांचे प्रतिपादन….
मंत्री नितेश राणेंसह दोन आमदारांविरुद्ध अटक वॉरंट जारी; न्यायालयाचा नेतेमंडळींना दणका….
एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा, दुसरीकडे फडणवीस सरकारचे चार महत्त्वाचे निर्णय समोर…..
काँग्रेसचा बुलंद आवाज हरपला ; महाराष्ट्राच्या माजी वनमंत्र्यांचे उपचारादरम्यान निधन….
जागावाटप ते महापौरपद, ठाकरे बंधूंनी सर्वच सांगितलं, मनसे-ठाकरेंकडून अधिकृत युतीची घोषणा….