लाडक्या बहिणींना शेवटची संधी, E KYC ची मुदत काही दिवसातच संपणार, किती दिवस उरले..?
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना महायुती सरकारने राज्यातील महिलांसाठी सुरू केलेली आहे. या योजनेच्या माध्यमातून लाखो पात्र महिलांना दर महिन्याला १,५०० रुपयांचा हफ्ता त्यांच्या बँक खात्यामध्ये वर्ग केला जातो.
आतापर्यंत मागील काही महिन्यांचे पैसे लाभार्थी महिलांना मिळालेही आहेत. आता लाडकी बहीण योजनेसाठी राज्य सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी आता लाभार्थी महिलांना ई-केवायसी (Ladki Bahin Yojana E KYC)अनिवार्य करण्यात आली आहे. योजनेतील सर्व लाभार्थी महिलांना ईकेवायसी (Ladki Bahin Yojana E KYC) पूर्ण करावी लागणार आहे. महिला व बालविकास विभागाकडून त्यासंदर्भातील पोर्टल विकसित करण्यात आलं आहे. या पोर्टलवर ईकेवायसी करताना ओटीपीबाबत तांत्रिक अडचणी महिलांना येत असल्याचं समोर आलं होतं. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी त्यांच्या सोशल मिडीया एक्स प्लॅटफॉर्मवर पोस्टकरुन ओटीपीबाबत येणाऱ्या अडचणींची बाब निदर्शनास आल्याचं सांगितलं. ईकेवायसीमधील तांत्रिक अडचणी दूर करण्यात येतील, असंही त्यांनी म्हटलं. त्यानंतर आता ईकेवायसी (Ladki Bahin Yojana E KYC)करण्याची शेवटची तारीख देण्यात आली आहे, या तारखेच्या आधी लाडक्या पात्र बहिणींना ईकेवायसी पूर्ण करावी लागणार आहे.
१८ नोव्हेंबर २०२५ पूर्वी e-KYC प्रक्रिया पूर्ण करावी
महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी त्यांच्या सोशल मिडीयावरती दिलेल्या माहितीनुसार, “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये पारदर्शकता येण्यासाठी व लाभार्थ्यांना नियमितपणे आर्थिक लाभ मिळण्यासाठी e-KYC सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या प्रक्रियेत अधिक सुसूत्रता आणण्याबाबत आज मंत्रालयात बैठक घेतली. दिनांक १८ सप्टेंबर २०२५ पासून https://ladakibahin.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर e-KYC सुविधा उपलब्ध आहे. यासाठी २ महिन्यांचा कालावधी देण्यात आला असून आतापर्यंत बहुतांश लाडक्या बहिणींनी ही प्रक्रिया पूर्ण केली आहे. उर्वरित लाभार्थी भगिनींनीही १८ नोव्हेंबर २०२५ पूर्वी e-KYC प्रक्रिया पूर्ण करावी असे मी सर्वांना आवाहन करते.” आदिती तटकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार योजनेतील पात्र लाडक्या बहिणीनी १८ नोव्हेंबर २०२५ पूर्वी e-KYC प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी.
लाडकी बहीण योजनेसाठी ई-केवायसी प्रक्रिया कशी पूर्ण कराल?
– मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेच्या e-KYC साठी https://ladakibahin.maharashtra.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.
– मुखपृष्ठावर असलेल्या e-KYC बॅनरवर क्लिक केल्यावर e KYC फॉर्म उघडेल.
– या फॉर्ममध्ये लाभार्थ्याने आपला आधार क्रमांक आणि पडताळणी संकेतांक (Captcha Code) नमूद करून, आधार प्रमाणीकरणासाठी संमती देत Send OTP या बटणावर क्लिक करावे. त्यानंतर लाभार्थ्याच्या आधार-लिंक मोबाईल क्रमांकावर OTP येईल. हा OTP टाकून Submit बटणावर क्लिक करावे.
– यानंतर प्रणाली तपासेल की लाभार्थ्याची KYC आधीच पूर्ण झाली आहे की नाही.
– जर आधीच पूर्ण झाली असेल, तर ‘e-KYC आधीच पूर्ण झाली आहे’ असा संदेश दिसेल.
– जर पूर्ण झाली नसेल, तर आधार क्रमांक मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र यादीत आहे की नाही हे तपासले जाईल.
– जर आधार क्रमांक पात्र यादीत असेल, तर पुढील टप्प्याला जाता येईल.
– यानंतर लाभार्थ्याने पती किंवा वडिलांचा आधार क्रमांक तसेच पडताळणी संकेतांक (Captcha Code) नमूद करावा. संमती दर्शवून Send OTP वर क्लिक करावे. OTP संबंधित मोबाईलवर प्राप्त झाल्यावर तो टाकून Submit बटणावर क्लिक करावा.
त्यानंतर लाभार्थ्याला आपला जात प्रवर्ग निवडावा लागेल आणि खालील बाबी प्रमाणित कराव्या लागतील:
1. माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित/कायम कर्मचारी म्हणून शासकीय विभाग/उपक्रम/मंडळ/भारत सरकार किंवा राज्य शासनाच्या स्थानिक संस्थेत कार्यरत नाहीत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत नाहीत.
2. माझ्या कुटुंबातील केवळ १ विवाहित आणि १ अविवाहित महिला या योजनेचा लाभ घेत आहे. वरील बाबींची नोंद करून चेक बॉक्सवर क्लिक करावे व Submit बटण दाबावे.
3. शेवटी, ‘Success – तुमची e-KYC पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे’ असा संदेश दिसेल.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..