बच्चू कडूंच्या आंदोलनाची वेळ संपली, कोर्टाचा आदेश घेऊन पोलिस आंदोलनस्थळी दाखल….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नागपूर :- “शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याच्या मागणीसाठी नागपूरमध्ये बच्चू कडू यांनी आंदोलन सुरु केलं आहे. या आंदोलनासाठी मोठ्या सख्येने शेतकऱ्यांनी पाठिंबा दिलेला आहे. मात्र कोर्टाने बुधवारी सहा वाजल्यानंतर आंदोलनस्थळ सोडण्याचे आदेश दिलेले होते.
परंतु आंदोलनाची वेळ संपली तरी बच्चू कडू आंदोलनावर ठाम असल्याचं दिसून येतंय.
कोर्टाने दिलेल्या आदेशाची प्रत घेऊन सायंकाळी सहा वाजता पोलिस अधिकारी बच्चू कडू यांच्या आंदोलनस्थळी दाखल झाले आहेत. त्यांची कडूंसोबत चर्चा सुरु असून आंदोलनाबाबत काय निर्णय होतो, हे पाहाणं महत्त्वाचं आहे.
जोपर्यंत मागण्या मान्य होणार नाहीत, तोपर्यंत आंदोलनस्थळ सोडणार नाही अशी भूमिका बच्चू कडू यांनी आधीच बोलून दाखवली होती. मात्र कोर्टाचा आदेश ते पाळणार का, हे पाहाणं महत्त्वाचं आहे. ‘जनताच आमचं कोर्ट आहे’ अशीही प्रतिक्रिया बच्चू कडू यांनी आधीच दिलेली आहे. त्यामुळे आता नेमकं काय होणार, हे लवकरच लक्षात येईल.

सुप्रिया सुळे प्रशांत जगतापांच्या नाराजीवर स्पष्टच बोलल्या; म्हणाल्या, ‘समाजात काम करताना नाराजी…’
गड्डमवार यांनी घडलेली विकास व कृषी क्रांती आजही प्रेरणादायी; आ. विजय वडेट्टीवार यांचे प्रतिपादन….
मंत्री नितेश राणेंसह दोन आमदारांविरुद्ध अटक वॉरंट जारी; न्यायालयाचा नेतेमंडळींना दणका….
एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा, दुसरीकडे फडणवीस सरकारचे चार महत्त्वाचे निर्णय समोर…..
काँग्रेसचा बुलंद आवाज हरपला ; महाराष्ट्राच्या माजी वनमंत्र्यांचे उपचारादरम्यान निधन….
जागावाटप ते महापौरपद, ठाकरे बंधूंनी सर्वच सांगितलं, मनसे-ठाकरेंकडून अधिकृत युतीची घोषणा….