उमरखेड मध्ये १ लाखाचा गुटखा जप्त ; दोघांवर गुन्हा दाखल ; एसडीपीओ पथकाची कार्यवाही
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
यवतमाळ :
जिल्ह्यातील उमरखेड येथे एका इसमाच्या घरी एसडीपीओ पथकाच्या चमुंनी धाड टाकून आरोग्यास हानिकारक असलेला प्रतिबंधित गुटखा किंमत ९६ हजार ९१० रुपयांचा जप्त केला आहे. गुटखा विक्रेते आरोपी तौफिक खान फकीर खान व त्याला सहकार्य करणाऱ्या आर्णी येथील शेख महेबुब शेख सादिक रा.आर्णी या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कार्यवाही एसडीपीओ पथकाच्या चमुनी काल दुपारच्या सुमारास केली आहे.
मिळालेल्या प्राप्त माहितीनुसार, उमरखेड येथील झाकीर हुसैन वॉर्डात राहणाऱ्या शेख तौफिक हा प्रतिबंधित गुटखा विक्री करत असल्याची गोपनीय माहिती एसडीपीओ पथकाला मिळाली होती.त्यानुसार प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी अनुराग जैन यांच्या मार्गदर्शनाखाली पथकातिल चमुंनी आरोपीच्या घराची झडती घेतली.त्यात प्रीमियम कंपनीचे राज निवास,नजर नामक प्रतिबंधित पान मसाला अंदाजित किंमत ९६ हजर ९१० रुपयांचा जप्त करण्यात आला आहे . याबाबत एसडीपीओ व त्यांच्या पथकाने अधिक तपास करून आरोपी शेख तौफिक यास सहकार्य करणाऱ्या आर्णी येथील शेख महेबुब शेख सादिक यास सहआरोपी करत विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले आहे.सदर कार्यवाही