पुसद शहरातील गौतम बुद्ध विहार समिती यांच्या वतीने धम्मचक्र परिवर्तन दिनानिमित्त महामानवांना अभिवादन कार्यक्रम उत्साहात संपन्न…..

पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
पुसद :- येथील गौतम बुद्ध विहार समिती यांच्या वतीने धम्मचक्र परिवर्तन दिनाच्या औचित्य साधून शहरातील विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर वार्ड पुसद येथे कार्यक्रमाचे आयोजन गौतम बुद्ध विहार समितीचे अध्यक्ष आयु यादव हाटे यांच्या नेतृत्वात करण्यात आले होते याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती प्रज्ञा पर्व समिती चे माजी अध्यक्ष आयु विठ्ठलरावजी खडसे सर आयु कल्याणजी साखरकर सर भीमशक्तीचे अध्यक्ष संतोष अंभोरे , आयु भगवान धुळे , एस एस व्ही इंटरप्राईजेस चे संचालक सुनील खडसे यांची विशेष उपस्थिती होती सर्वप्रथम गौतम बुद्ध विहार समिती महिला मंडळ पुसदच्या वतीने सामूहिक त्रिशरण पंचशील घेण्यात आले त्यानंतर प्रज्ञापर्व समिती चे माजी अध्यक्ष आयु विठ्ठल रावजी खडसे सर व आयु भगवान धुळे यांच्या हस्ते पंचशील ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न झाला त्यानंतर उपस्थित जनसमुदायाला बुंदीचे वाटप समितीच्या वतीने करण्यात आले या कार्यक्रमा चे प्रस्ताविक मुनेश्वर हाटे यांनी केले तर आभार प्रदर्शन माधव हाटे यांनी केले कार्यक्रमाला मोठ्या संख्येने परिसरा तील महिला व पुरुषांचे उपस्थिती होती सर्वांनी एकमेकांना धम्मचक्र परिवर्तन दिनाच्या शुभेच्छा दिल्या त्यानंतर कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी गौतम बुद्ध विहार समिती महिला मंडळ पुसदचे विशेष सहकारी लाभले हे विशेष…