एकतर विजयी यात्रा,नाहीतर अंत्ययात्रा निघेल; मनोज जरांगेंची आंदोलकांना साद….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- “जरांगे यांच्या उपोषणामुळे राजकारण तापलं
मनोज जरांगे यांच्या उपोषणाला एका दिवसाची मुदतवाढ
मनोज जरांगेंकडून आंदोलकांना भावनिक साद
मनोज जरांगे यांच्या उपोषणामुळे राजकीय वर्तुळातील वातावरण ढवळून निघालं आहे.
मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षणाची मागणी मराठा आंदोलकांनी लावून धरली आहे. याच मागणीसाठी जरांगे उद्यापासून पाणी पिणे देखील सोडणार आहे. त्यामुळे मराठा आरक्षण आंदोलन आणखी तीव्र झालं आहे. आझाद मैदानातील आरक्षण आंदोलनात मनोज जरांगे यांनी आज रविवारी रात्री आझाद मैदानातून आंदोलकांना भावनिक साद घातली आहे. एकतर विजयी यात्रा,नाहीतर अंत्ययात्रा निघेल, अशा शब्दात जरांगे यांनी मराठा बाधवांना साद घातली.
मनोज जरांगे यांच्या भाषणातील मुद्दे
आम्ही खेड्यातले आहेत,पण आम्हाला अक्कल आहे. त्यामुळे एवढा लढा लढतोय ना
शिंदे समितीचं काम नोंदी शोधणं आहे. प्रमाणपत्र देणं त्यांच्या हातात आहे. संबंधित मंत्रालयाने त्यांचे अधिकार काढले तर तेच मंत्रालय प्रमाणपत्र देते.
शिंदे समितीचं काम म्हणजे नोंदी शोधून अहवाल तयार करणे. त्यांनी तीन खंड बनवून सरकारला दिले. आता पुढची प्रक्रिया म्हणजे सरकारने अंमलबजावणी केले.
मराठा समाजाच्या पोरांना सांगतोय, कोणताही नेता आला. भाजपविरोधी पक्षाचा असेल, त्याला त्रास देऊ नका.
पत्रकारानं सांगितलं की, तुम्ही गोंधळ घातला, पण तुम्ही गोंधळ घालणार असाल तर कोण येणार नाही.
सन्मान करा, आरक्षण भेटत नाही, तेव्हा आपण काय करायचं ते कोणत्याही नेत्याला माघारी बोलू नका.
गोंधळ घालणारे कोण आहेत, ते बघावे लागणार आहे.
सरकारने पाठवलेले आहेत का, बघायला लागेल माझे पोरं असे करणार नाहीत.
थोडं सावध राहा, बाकी मी सगळं बघतो.
पोरांना सांगणे आहे, रस्त्यात गाड्या लावू नका.
शिवी देऊन समुद्रात जाऊ नका, असा कार्यकर्त्यांना समान
समुद्राच्या पाण्यात गेलेलं, एक पण दिसलं नाही पाहिजे.
जिंकायचे आहे, आपल्याला एक एक माणूस म्हत्वाचा आहे. ते पाणी चांगले नाही. त्यात उतरू नका.
तोडगा सोपा आहे. सरसकट शब्द तुम्ही लावू नका. तुमचं म्हणणे आहे की, उपसमितीची दोनवेळा बैठक झाली. मला माहीत नाही. पण सुप्रीम कोर्टाचा सरसकटला प्रॉब्लेम आहे.
तुमच्याकडे ५८ लाखाचा नोंदीचा आधार आहे. ज्यांच्या नोंदी सापडल्या आहेत. ज्यांचे सापडले नाही, त्यांची पोटजात उपजात वापरून आरक्षण द्या ना, सरसकट म्हणू नका…
५८ लाखांच्या नोंदी आहेत, त्याऐवजी जीआर काढा. तुम्हाला ओबीसी आरक्षण द्यायचे असेल.
वॅलिड करायला पोटजात आणि उपजात काढायला. ज्याला घ्यायचे आहे, ते घेईल. ज्याला नाही घ्यायचा, ते नाही घेणार. सरसकट बोलण्याची गरज नाही.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..