विद्यापीठांच्या आर्थिक सक्षमीकरणाबाबतचा अहवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सादर….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई, दि. 23 :– उच्च शिक्षण विभागाच्या अधिनस्त असलेली सर्व अकृषी विद्यापीठे आणि सर्व संस्था यांच्या आर्थिक सक्षमीकरणाचा अभ्यास करण्यासाठी गोखले राज्यशास्त्र व अर्थशास्त्र या संसथेची निवड करण्यात आली होती. तसेच या अभ्यासासाठी संस्थेकडून डॉ. नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना करण्यात आली आहे. या समितीमध्ये डॉ अजित रानडे, प्रो. अभय पेठे, विश्वनाथ गिरीराज, डॉ. विशाल गायकवाड यांचा समावेश आहे. या समितीने आपला अंतिम अहवाल आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सादर केला.
या समितीने प्रामुख्याने पुढील बाबींचा अभ्यास केला आहे. उच्च शिक्षण संस्थांना जागतिक स्तरावर कशा प्रकारे वित्तीय सहाय्यता प्राप्त होते, सद्यस्थितीत राज्यातील उच्च शिक्षण देणाऱ्या संस्थाांना कशा प्रकारे निधी प्राप्त होतो. तसेच यातील असमानता व विसंतगी शोधणे, सर्व अकृषी विद्यापीठे व उच्च शिक्षण देणाऱ्या संस्थांचा विद्यमान आर्थिक स्थितीविषयक अहवाल व तूट भरून काढण्यासाठी उपाय योजना, उच्च शिक्षणामध्ये भागिदारी व गुंतवणुकीतून आर्थिस सहाय्य उभारण्यासाठी प्रोत्साहन देणे, पर्यायी वित्त पुरवठा मॉडेलचा संपूर्ण उच्च शिक्षण व्यवस्थेच्या प्रवेश क्षमता, गुणवत्ता, शैक्षणिक शुल्क तसेच संभाव्य परिणामांवर पडणारा अनुकुल प्रभावाची समिक्षा करणे.
हा अभ्यास करताना या समितीने राज्यातील अकृषी विद्यापीठांचे कुलगुरू, उच्च शिक्षण देणाऱ्या संस्था यांच्याशी चर्चा केली आहे. तसेच त्यांनी विद्यापीठांचे इन्फ्रास्ट्रक्चर वाढवणे, उत्पन्न वाढवण्याचे पर्यायी मार्ग, जमीन, पायाभूत सुविधा आणि बौद्धिक संपदांचे मॉनिटायझेशन करणे तसेच विद्यापीठे आणि उच्च शिक्षण संस्था यांचे शासनावरील अवलंबित्व कमी करण्याविषयी उपाययोजना सूचवल्या आहेत.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..