‘चिन्ह चोरले, पक्ष फोडला, वडील चोरले तरी उद्धव संपत नाही’; उद्धव ठाकरेंची विरोधकांवर बोचरी टीका…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- “चिन्ह चोरले, पक्ष फोडला, वडील चोरले तरी उद्धव संपत नाही. पैसा फेको तमाशा देखो असा विरोधकांकडे चोराचा बाजार भरला आहे. जे दाढी खाजवत आहेत ते आधी कुठे होते माहित नाही. आजच्या आपल्या वर्धापन दिनाच्या दिवशी जमलेल्या शिवसैनिकांचा जयघोष पाहिला तर विरोधकांचे नॅपकिनसह कपडे ओले होतील,’ अशी बोचरी टीका उद्धव ठाकरे यांनी विरोधकांवर केली.
ते शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते.
शिवसेनेचा 59 वा वर्धापन दिन आज साजरा होत असून, ठाकरे गट आणि शिंदे गट या दोन्ही गटांनी स्वतंत्र सोहळे आयोजित केले आहेत. ठाकरे गटाचा सोहळा मुंबईत षण्मुखानंद हॉलमध्ये तर शिंदे गटाचा सोहळा वरळीत होणार आहे. दोन्ही गटांकडून जोरदार तयारी करण्यात आली असून नेत्यांच्या भाषणांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे
59 वर्ष झाली तरी शिवसेना तरुणच आहे आणि तरुणच राहणार आहे असे शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शुभेच्छा देताना म्हटले.
उद्धव ठाकरे यांनी शिंदेवर घणाघात केला आहे ते म्हणाले की जे आपला बाप बदलतात आणि राजकारणात ज्यांना पोर होत नाही ते घराणेशाहीवर टीका करतात त्यांची कीव येते.
शिंदेंचा मेळावा म्हणजे पैसा फेको तमाशा देखो असा आहे.
भाजपचे सरकार आल्यानंतर पनवती लागली आहे. एअरपोर्टचे छत गळतं आहे. मेट्रो स्टेशनमध्ये पाणी, प्रयागराजमध्ये चेंगराचेंगरी, विमान अपघात.. खरंतर आज आपल्या देशाला पंतप्रधांनाची गरज आहे. पण पंतप्रधान नसल्यासारखी अवस्था आहे. हे पंतप्रधान भाजपचे आहेत.
ज्यांना राजकारणात पोरं होत नाही ते आमच्यावर टीका करतात. अरे तुला पोरं होत नाहीत. आम्ही काय करू. भाजपचे लोक असेच आहेत.
ज्या सरदार पटेलांनी संघावर बंदी आणली. त्याच सरदार पटेलांचा सर्वात मोठा पुतळा उभारला. हे यांचं हिंदुत्व.
तुझी उंची केवढी, आवाज कसा, उंची पेंग्विनची, चाल बदकाची, जीव केवढा, बोलतोस काय, वडिलांची पार्श्वभूमी काय कोणावर बोलतोस, एक कोणतरी बाप ठरवा अशी नाव न घेता राणेंवर उद्धव ठाकरेंनी बोचरी टीका केली.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..