धरती आबा अभियानांतर्गत हर्षी व मरसूळ येथे जनजागृती शिबिर ; 139 लाभार्थ्यांना विविध प्रमाणपत्र, दाखल्यांचा लाभ….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
यवतमाळ, दि.20 :- धरती आबा जनजाती ग्राम उत्कर्ष अभियानांतर्गत पुसद तालुक्यातील हर्षी येथे विशेष जनजागृती कार्यक्रम व शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या दोन शिबिरात एकून 139 नागरिकांना विविध प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले.
हर्षी येथील शिबीराचे उदघाटन पुसद तहसिलदार महादेव जोरवार व एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प पुसदचे प्रकल्प अधिकारी अमोल मेतकर यांच्याहस्ते झाले. मरसुळ येथील शिबिराचे उद्घाटन गटविकास अधिकारी संजय राठोड यांच्याहस्ते झाले. या दोनशी शिबिराला गावातील आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका, कोतवाल, पोलिस पाटील, तलाठी, ग्रामसेवक, मंडळ अधिकारी, कृषी सहायक, नोडल अधिकारी व इतर संबंधित विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
दोन्ही ठिकाणी 240 नागरीकांनी सहभाग घेतलेला आहे. तर 139 लाभार्थ्यांना विविध प्रमाणपत्र, दाखल्याचे वितरीत करण्यात आले. पीए जनमन या योजनेच्या धर्तीवर धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान राबविले जात असून यात 25 प्राधान्यक्षेत्रे व 17 मंत्रालयांचा सहभाग आहे. पुसद प्रकल्प कार्यक्षेत्रात पुसद, नेर, दारव्हा, दिग्रस, आर्णी, महागाव, उमरखेड तालुक्यातील 147 गावे व पारधी बेडे, गावांमध्ये धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियानांतर्गत विशेष जनजागृती मोहिम व शिबिर दि.30 जूनपर्यंत राबविण्यात येत आहे.
या विशेष शिबिराच्या माध्यमातून मतदार ओळखपत्र, आधार कार्ड, रेशन कार्ड, जातीचे प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र, जॉब कार्ड, आयुष्मान भारत कार्ड, पीएम किसान, जनधन खाते असे अनेक दाखले व योजनांचा लाभ एकाच छताखाली व प्रत्यक्ष ग्रामस्तरावर जाऊन उपलब्ध करून देण्यात येत आहे. पुसद प्रकल्पात 64 ठिकाणी शिबिरांचे आयोजन केले जात आहे. पुसद प्रकल्पातील नागरिकांनी शिबिरात आवश्यक कागदपत्रांसह सहभागी होऊन दाखले, प्रमाणपत्र व विविध योजनांचा लाभ घ्यावे, असे आवाहन प्रकल्प अधिकारी अमोल मेतकर यांनी केले आहे.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..