शाळांमध्ये मराठी भाषा शिकवा नाहीतर गाठ शिक्षणमंत्र्यांशी; शाळाच रद्द करण्याचा भुसेंचा इशारा….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- “राज्यांतील शाळांत हिंदी भाषेची सक्तीच्या मुद्द्यावरुन राजकारण तापलं आहे. मनसेने या हिंदी भाषेच्या सक्तीला कडाडून विरोध केला आहे.
काँग्रेसनेही या धोरणावर कडाडून हल्ला केला आहे. या मुद्द्यावर राज्य सरकार पुन्हा बॅकफूटवर गेलं आहे. यातच मराठी शाळांतील घटत चाललेली पटसंख्या आणि मराठी शिकवण्याकडे दुर्लक्ष हे दोन मुद्दे चर्चेत आले आहेत. या मुद्द्यांवर शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांनी राज्यातील शाळांना कठोर इशारा दिला आहे. शाळांतून जर मराठी भाषा शिकवलीच जात नसेल तर अशा शाळाच रद्द करण्याची कारवाई करू, असा इशारा मंत्री भुसे यांनी दिला.
..तर शाळांची मान्यताच रद्द करू
शाळांत मराठी भाषा बंधनकारक असतानाही अनेक शाळांत मराठी शिकवली जात नाही अशा तक्रारी आहेत मग अशा शाळांवर काय कारवाई करणार? असे विचारले असता भुसे म्हणाले, असा प्रकार जर शासनाच्या निदर्शनास आला तर अशा शाळांवर कठोर कारवाई केली जाईल. एक दोन वेळेस समज दिल्यानंतरही जर मराठी शिकवणे त्यांनी सुरू केले नाही तर त्या शाळा रद्द करण्यााचाही निर्णय घेऊ.
मागील 13 वर्षांत एकट्या मुंबईत 132 शाळा बंद पडल्या आहेत. शाळांतील पटसंख्या घसरत चालल्याने असे होत आहे असे विचारले असता मंत्री भुसे म्हणाले, ही वस्तुस्थिती आपल्याला स्वीकारावी लागेल. मराठी शाळा कशा टिकतील त्या कशा वाढतील किंबहुना महापालिकेच्या शाळांतही पटसंख्या घटत चालल्याचे दिसून येत आहे. त्या दृष्टीकोनातून ज्या ज्या काही चांगल्या सूचना येतील त्यांचं नक्कीच पालन केलं जाईल.
दैनंदिन जीवनात हिंदीचा जास्त वापर
हिंदी भाषेच्या सक्तीच्या मुद्द्यावर त्यांनी राज्य सरकारची भूमिका मांडली. ते म्हणाले, केंद्र सरकार विद्यार्थ्यांनी गुण पद्धतीच्या संदर्भात तिसऱ्या भाषेलाही गुणांकन असणार आहे. महाराष्ट्राचे विद्यार्थी भविष्यात या गुणांत पाठीमागे राहू नयेत म्हणून हे त्रिसूत्री जे धोरण आहे त्याचा स्वीकार आपण करत आहोत. विद्यार्थ्यांना सोयीचे तसेच त्यांना मेरिटमध्ये येण्यासाठी जास्तीत जास्त सपोर्ट कुठे होईल याच विचार केला जात आहे.
दैनंदीन जीवनात संवाद साधताना त्यातल्या त्यात हिंदी भाषेचा जास्त वापर असतो. म्हणून हे सर्व मुद्दे आम्ही विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांवर सोपवले आहेत. ते ज्या पद्धतीने मागणी करतील त्यानुसार तिसरी भाषा शिकवण्याची तरतूद त्याठिकाणी करुन दिली जाईल असे वक्तव्य दादा भुसे यांनी केले.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..